हॅपी  " ३१ डिसेंबर ते जानेवारी..."

"उद्यापासून रे उद्यापासून, बघच तू.."... इथपासून ते आगदी.. "...उद्याssssपा ssसून याsss..बघ तू sss....".. इथपर्यंत वचन, प्रतिज्ञा , आणाभाका आणि इतर बरच काही घेऊन मध्यरात्र उलटलेली असते… “उद्यापासून यूssss  वील सीsss डिफरंन्स इन मी ssss "...उत्तररात्री वर थोडा इंग्रजीचा (खरंतर जरा जास्त झालेल्या "इंग्लीश"चा  )  अंमलही चढायला लागलेला असतो ... ऐकणारा मित्र पण तेवढ्याच आवेगात आणि शक्यतो खूप लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करून मान डोलावत सहमती साठी टाळी देत असतो (सांगणाऱ्याच्या हातावर ती पडता)  ... एकंदर काय तर ब्रम्हानंदी बऱ्याच टाळ्या वाजल्यानंतर त्या रात्रीची ती  ३६५ दिवसांची कहाणी जानेवारी ला पहाटे सफल संपूर्ण होते …"उद्यापासून अमुक अमुक बंद"... ते ... " तमुक तमुक सुरु करतो.." ... आणि " हा आता शेवटचा झुरका..." ... पासून ते...  " उद्या पासून जिम नक्की ..." इथपर्यंतचे नवीन बियाणे डोक्यात रुजवून. 

का असं??... विचारू नका... निदान त्या दिवशी तरी.!...आधीच आदल्या रात्रीचा आलेला "शीण" ( हँगओव्हर ला हा एक अति-सौम्य पर्यायी शब्द..) , त्यांत परत आपण हे काय बोलून बसलो आणि ह्या सगळ्या आपल्या वाईट व्यसनांची अंतयात्रा वर्षाच्या पहिल्याच दिवशी निघणार  त्याला खांदा देऊन पोचवायची जबाबदारी पण आपलीच आहे ही बोचरी दबावात्मक झोंबणारी "जाणीव" जानेवारी च्या दुपारी होते ( हो! सकाळ नवीन वर्षाच्या दिवशी नेहमी दुपार नंतरच उगवते!!!)... आपण उचलेला 'पण'...हे एक फार मोठे शिवधनुष्य आहे हे समोर दिसायला लागत..! लिंबू पाणी, कोरी कॉफी वगैरे पिऊन तो रात्रीचा "शीण" घालवला जातो ...  पण ही "जाणीव" मात्र बोचतंच राहते... आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस  ह्या अस्वस्थतेत सुरु होतो.

"जी.." च्या एका लेखात त्यांनी सुख आणि दुःखाला दिलेली मांजर आणि कुत्र्या ची उपमा इथे चपखल बसेल... त्याच मीटर मध्ये बोलायचा जर झालं तर साधारण असं म्हणता येईल... व्यसन हे नेहमी कुत्र्या सारख निष्ठावान असत आणि विवेकी, संयमी मन हे मांजरा सारखं ... .. ही व्यसनरुपी कुत्री " हाडम्हटल्यावर चटदिशी दूर होतात, पण थोड्याच वेळा पुरती. आणि परत फिरून येतात आपल्यापाशी मुक्कामाला, इमानी सोबती म्हणून ... त्या उलट ती सयंम आणि निर्धाररुपी मांजरे...पायावर लाडाने अंग घासणारी, थोडीशी उब निर्माण करून स्वतःला गोंजारून घेणारी  ..आणि पुरेसं लाडावून झाल्यावर दुसऱ्याच्या पायात घोळायला जायला मोकळी होणारी.... दर  वर्षी  अगदी हे असच घडत असत... व्यसनांना आपण जानेवारी पासून हुसकावून लावायचा पण करतो आणि संयम, निर्धाराचे लाड करायचे ठरवतो...आणि मग... जानेवारीला त्या मांजराला हुसकावून लावीत कुत्रा पुन्हा आपल्या सेवेत रुजू होतो...इमान इतबारे चाकरी करत राहतो... परत पुढील ३१ डिसेंबर पर्यंत..!!

मित्रानो....नूतन वर्षाच्या तुम्हा सर्वाना अनेक उत्तम शुभेछ्या..!!... आणि विशेषतः ..  " सुपारीच्या खंडाचंच फक्त व्यसन नसलेल्या " ... आणि ... "जिम ला उद्या पासून जाऊ"  असं रोज ठरवणाऱ्या माझ्या तमाम मित्र, आप्त, स्वकीयांना ३१ डिसेंबर ते जानेवारी हा काळ सुखाचा ठरो हि "श्री" चरणी प्रार्थना..!!!
***
प्रकाश केळकर

Comments

  1. छान
    काँपी प्रोटेक्शन साँफ्टवेअर वापर.

    ReplyDelete
  2. Khara aahe! ! Resolutions aajibaat palta yet nahit😀

    ReplyDelete
  3. Nice! Well said! Very true,I don't know for whose satisfaction we really do it.We are first tensed about declaring it and feel quiet tensed till the time everybody know about resolution being broken.You have made it quiet subtle .

    ReplyDelete
  4. म्हणूनच मी new year resolutions ठरावतच नाही...
    छान लिहिलं आहे PK

    ReplyDelete
  5. खरं तर 31 डिसेंबर ला
    No commitment is my commitment .हेच खरं .
    प्रकाश सर, सुंदर शब्दांकन .👌

    ReplyDelete
  6. No resolutions can be the best resolution as we can be truthful to ourselves at least. उत्तम लेख

    ReplyDelete
  7. Absolutely right, I'm sure there will be exception.

    ReplyDelete
  8. Nice to read this on 2nd Jan...and say I have no resolution!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog