अरे sss कुठे नेवून ठेवलाय माझा ...
गेले काही आठवडे धमाल चालू आहे... बोरिवलीच्या उद्यानाच्या हद्दीबाहेरील एका भल्या मोठ्या जंगलात नुसता धुमाकूळ चालू आहे. टीव्ही लावला की तो चोवीस तास पाहायला मिळतोय . माकडांच्या कोलांट्याउड्या, वाघाचे खेळ आणि इतर बऱ्याच जणांचं बरंच काही पाहून हसता हसता डोळ्यात पाणी येतंय... सांगता येत नाही आणि सहनही होत नाही इतकी करमणूक ... पण म्हणून मोजक्या शब्दात मांडायचा हा एक प्रयत्न ...
घड्याळाच्या तबकडीवर होता
फिरत एकच फक्त हात,
अन् वाघाच्या जबड्यात होते
दिसत दुधाचेच दात...
भगव्याला लावून पाहीली त्यांनी
हिरवी एक झालर,
उजवी कडून चालणारे मग
बोलत राही ले सेक्यूलर...
पन्नास पन्नासची बेरीज त्यांची
तिन आकड्यांच्या भागाकारातून
उत्तराची त्यांना घाई होती...
रात्रीच्या चांदण्यात अचानक
वनरा ज सिंव्ह अवतरले,
सुर्योदय होताहोताच त्यांनी
सिं हासन आपलेसे केले...
सामना हरल्या वाघा आता
दावत बस तू वाकुल्या,
कुठे नेत होतास माझा महाराष्ट्र,
तुझ्याऽऽ X X X...
*****
टिप: X X X हे “ फुल्या फुल्या फुल्या” असे वाचावे.
Masstch
ReplyDeleteमस्त
ReplyDelete👌👍
ReplyDeleteरात्रीच्या काळोखात स्कार ने आव आणला
ReplyDeleteहैना च्या जवळीकीने डाव मांडला .
मुफासा ला माहीत चोर वाटा...
बघे म्हणत राहिले हकुना मटाटा ......
Mast re
ReplyDelete