… बंदिस्त
भावमुद्रा …
माझी
फोटोग्राफर मैत्रीण नेहा वैद्य नुकतीच नागालँड च्या दौऱ्यावर जाऊन आली...
तिच्या अप्रतिम " eye behind the camera " ने टीपलेले क्षण मला
नुकतेच पाहायला मिळाले ... ईशान्य भारताचा हा भाग निसर्गसमृद्ध आहे.
त्या सुंदर स्थळांचे तिने काढलेले फोटो उत्तम आहेतच ... पण तिने आपल्या कॅमेऱ्यात
पकडलेले काही चेहेरे मला विशेष भावले... त्यातल्याच
ह्या काही "बंदिस्त भावमुद्रा" ... नेहा च्या
कॅमेऱ्यातून आणि माझ्या शब्दात.
वन, टू, थ्री स्माईल प्लीज ऐकल्यावर क्लिक असा आवाज यायच्या आत काही मिलीसेकंदांमधे जे उमटतं त्यासारखं खोट हास्य जगात दुसरं कोणतही नसेल... हीच्या बाबतीतही काही वेगळ घडलं नाहीये... आपला कोणी फोटो काढतंय ह्या क्षणिक आनंदात तीने पण हे स्माईल दिलं असणार ...कृत्रिम. पण खरं बंदिस्त झालय ते तिच्या डोळ्यात उमललेलं निर्मळ हासू... स्पष्ट दिसतायत ते... तृप्त आहे, सगळं कसं छान आहे हे स्वच्छ सांगणारे तीच्या डोळ्यातलं ते आनंदी भाव...आणि तीला ते लपवतां आलं नाहीये... डोळ्यात साठलेलं नितांत सुंदर लोभस स्माईल...
कोणाही व्यक्तीचे फोटो काढून झाल्यावर ह्या पुढे फक्त त्या फोटोतील डोळ्यातच पाहावं का?...काय दडलंय कळायला... असं वाटायला लावणारं!!!
ही तुमच्या साठी पेटवलीय...वाट दिसावी म्हणून.... मला तसही अंधारात दिसतं... सवय झालीय त्याची. आणि हो! माझ्या आत अखंड पेटलेली जी मशाल आहे त्याचं तेज मला वाट दाखवतं. ती मशाल मीच चेतवलीय कधीतरी... परिस्थिती ला सामोरं जाताना... आणि आता ती अखंड तेवतेय. असं काहीसं सांगू पाहाणार्या ह्या स्त्रीच्या चेहेऱ्यावरचे हे भाव त्या अग्नी प्रकाशात अजूनच तळपताना दिसतायत... तीच्या आत तीने अखंड पेटत्या ठेवलेल्या स्त्रीत्वाच्या तेजाने तावून सुलाखून निघालेले ते स्वत्व, स्वाभिमान आणि अफाट आत्मविश्वास दाखवणारे ठाम भाव... विलक्षण !!!
इंग्रजीत डब केलेल्या चायनीज सिनेमा मधला योध्दा
आठवला याला पाहून... बोलण्यासाठी झालेली ओठांची हालचाल बंद झाल्यावर जसे संवाद त्या
सिनेमांमधे नंतर ऐकू यायचे तसच काहीसे ह्याच्याही चेहेर्यावरचे भाव दिसतायत... पण इथ
ऐकायला काही कानावर पडलं असेलसं वाटत नाही... त्याला जे बोलायचंय ते तो बोलून गेलाय
...मनातल्यामनात...कोणालाही न ऐकायला येतां... चेहेर्यावर मात्र त्याच्या दिसतय... काहीतरी आत तो बोलून गेल्याचं. काय बोलला असेल तो
स्वता:शी ? का चेहऱ्यावरचे भाव कॅमेऱ्यात बंदिस्त होताना मनातलं पण टिपून ठेवतील असं वाटलं असेल... ? का शिरस्त्राणा मधून डोकावणार्या आपल्या पांढर्या होत चाललेल्या
केसांतून आणि विरळ दाढीच्या खुंटा सोबत दिसणार्या चेहेर्यावरच्या सुरकुत्यांमधून आपल्या
मनातले संवाद प्रगट होतायत कि नाही ह्याची चिंता त्याला भेडसावली असेल? ... काहीतरी
त्याला सांगायच होतं हे नक्की...खरंच!... कॅमेऱ्या मधून मनांत पण डोकावतां आलं असतं
तर? कीती बरं झालं असतं !!!
*** प्रकाश केळकर
फोटो श्रेय : नेहा वैद्य
फोटो तर सुंदर आहेतच, पण त्या फोटोतल्या व्यक्तींची व्यक्तिचितत्रं फार छान रंगवली आहेस!
ReplyDeleteउत्तम
ReplyDeleteSuperb photos...backed by your wonderful prose...Prakash you should try and post a voice note of the same...it will be perfect!
ReplyDeleteफोटोतर छान आहेतच
ReplyDeleteशब्दांकन पण अतिशय सुंदर आहे.
सुंदर शब्दचित्र
ReplyDeleteसुंदर फोटो आणि लिखाण
ReplyDeleteचेऱ्यावरचे भाव वर्णन चित्रा एवढेच सुंदर...खरच चेऱ्यावरून मनापर्यंत पोहोचता यायला हवे होते....
ReplyDeleteExquisite pictures Neha 👏with apt wording makes the pictures so live👏.. wow
ReplyDeleteNicely captured in pictures and words!
ReplyDeleteNice pics and words combo
ReplyDelete