एक दिन... रहदारीतला.
स्थळ: मेन रोड, ट्राफिक सिग्नल ; वेळ: सकाळची,घाईची.
स्थळ: मेन रोड, ट्राफिक सिग्नल ; वेळ: सकाळची,घाईची.
सिग्नल लाल होता... हो! नक्की लाल होता... पण, मला रंगांधळेपण आलय कि काय अशी शंका
येईल इतकी आजूबाजूने रहदारी पुढे जात होती. स्कुटर, गाड्या, रिक्षा...एक छोटा
टेम्पो पण सिग्नल पार करून पुढे गेला... मी थांबलो होतो मात्र! हो, लालच होता
सिग्नल. नक्की!... मी माझ्या शर्टचा रंग पाहून परत एकदा खात्री केली. मला
शर्ट निळा दिसला. कालच घेतलाय नवीन, रंग विसरायचा प्रश्नच नाही... पण तरी एक शंका
चाटून गेली. मला कदाचित लांबच रंगांधळेपण आलं असावं... लांबचा चष्मा लागतो ना!
तसं... मला तरी अजून सिग्नल लाल दिसत होता!... दोन हात पलीकडे अजून एक माझ्या
सारखाच उभा. मोटारसायकल वर बसून हेल्मेट मधून सिग्नल कडे पाहणारा...बहुतेक त्याला
पण सिग्नल लाल दिसत असणार!!! त्यानी मला पाहिलं आणि मुंडी हलवली,
हेल्मेटच वायझर वर केलं आणि माझ्याकडे पाहात हसून म्हणाला... " मी एरवी
अमेरिकेत असतो. सुट्टीवर आलोय... तुम्ही कोणत्या परदेशात राहता?" ...
दोघे मनमुराद हसलो... तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला. निदान आम्हा दोघा
रंगआंधळ्यांना तरी तो तसा दिसला... आणि आम्ही सिग्नल (आधीच) पार करत असलेल्या
रहदारीत मिसळून गेलो.
स्थळ: असाच एक गजबजलेला रस्ता ; वेळ: संध्याकाळची, घरी पोचायची
त्या झेब्रा क्राॅसिंगचे पट्टे नुकतेच रंगवले असणार... डांबरी काळ्या आणि त्यावर ताज्याताज्या खणून परत बुजवलेल्या मातीच्या खुणांचा ओरखडा असलेल्या सडकेवर ते जास्तच उठून दिसत होते... सिग्नलचा दिवा नुसताच पिवळा लुकलुकत होता... “बंद आहे बहुतेक.विसरतात कधी कधी चालू करायला. हरकत नाही, आपण जाऊ चालत पलिकडे.” आजोबांनी स्वतःशी बोलत हातातील पिशवी आणि दुसर्या हातातील काठीची मुठ घट्ट पकडली. एक खोल श्वास घेतला आणि उजव पाऊल पुढे टाकलं... 'हो! ही नेहमी सांगते, कठीण प्रसंगात नेहमी उजवा पुढे असावा. मग पुढचं सोप्पं जातं' ...
स्थळ: असाच एक गजबजलेला रस्ता ; वेळ: संध्याकाळची, घरी पोचायची
त्या झेब्रा क्राॅसिंगचे पट्टे नुकतेच रंगवले असणार... डांबरी काळ्या आणि त्यावर ताज्याताज्या खणून परत बुजवलेल्या मातीच्या खुणांचा ओरखडा असलेल्या सडकेवर ते जास्तच उठून दिसत होते... सिग्नलचा दिवा नुसताच पिवळा लुकलुकत होता... “बंद आहे बहुतेक.विसरतात कधी कधी चालू करायला. हरकत नाही, आपण जाऊ चालत पलिकडे.” आजोबांनी स्वतःशी बोलत हातातील पिशवी आणि दुसर्या हातातील काठीची मुठ घट्ट पकडली. एक खोल श्वास घेतला आणि उजव पाऊल पुढे टाकलं... 'हो! ही नेहमी सांगते, कठीण प्रसंगात नेहमी उजवा पुढे असावा. मग पुढचं सोप्पं जातं' ...
“पीऽऽऽऽऽऽऽप...” कानठळ्या बसवणारा मोटरसायकलचा हाॅर्न वाजला
आणि आजोबांच पाऊल त्या आवाजानं आपोआप मागे आलं. जणू पायाला कान असल्या सारखं...
“उजवी डावी बघून क्राॅस करायच नेहमी” आजोबांना नातवाचे बोल आठवले. हो! पण मी
रस्त्याच्या कडेच्याही बाहेर होतो. तीथून पण जातात का गाड्या...असेल! पुढच्या वेळी
पाहून मग पुढे जाऊ. ही घरी वाट पाहात असणार. तीच औषध आणायला बाहेर पडलो
तेव्हाच म्हणाली होती “दुपारचे जात जा... संध्याकाळी घाईच्या वेळी नको” ... अर्धा
तास इथेच गेला. अजून रस्ता पार करायचाय.ते झाल की मग दहा मिनीटांत घर... आजोबांनी
काठी हवेत वर उंच धरली. डाव्या हातातली औषधाची पिशवी घट्ट पोटाशी दाबून
ठेवली आणि धीर एकवटून परत पाउल टाकलं. आरे वा! काठीच्या सिग्नलचा उपयोग
होतोय म्हणायचा. एक स्कुटीवरची मुलगी थांबली कि... चला सुटलो... आजोबांनी काठीचा
सिग्नल अजून वर केला आणि दुसरं पाऊल टाकणार... “ कीऽऽऽऽखर्रऽऽऽऽ धाऽऽऽड”... पडता
पडता तोल सांभाळत काठी टेकायच्या प्रयत्नात ती कुठे उडाली देव जाणे... काय झालं ?
झाला का आपला रस्ता क्राॅस? ... हे डाव्या बाजूला कपाळावर ओलसर काय लागतय! रक्त??
हे कशानं? ... आजोबांनी हातातली पिशवी चाचपली... 'कफ सिरपची बाटली फुटली वाटतं.
त्याचाच हा चिकट उग्र दर्प हाताला जाणवतोय... आणि हा कोण हाताला धरून उठवतोय?
वेशावरून रिक्षावाला असावा'... " लागलं का काका? रस्ता सांभाळून क्राॅस करत
जा.नशिब ते मोटरसायकलवरचं पोरग फाष्ट नवतं, नायतर धडकून पार हाडाचा भुगाच झाला
असतां तुमच्या. कशाला संघ्याकाळचं भाईर पडतां? गप घरी बसा की देवाम्होर..."
फुकटचा सल्ला आणि तंबाखूची पिंक टाकत तो भुर्रकन निघूनही गेला... कपाळावरची
जखम दाबत आजोबा उठले. ' औषध परत आणायला लागणार...उद्या जरा दुपारीच निघावं... ते
बरं! संध्याकाळी लोकांना घरी पोचायची घाई असते.नाही क्राॅस करता येत... हो पण इथला
सिग्नल का चालू झाला नाहीये? उद्या लिहायला हवं वाचकांच्या पत्रात.'...
स्वता:शीच बोलत बोलत पुढच्या रहदारीत ते मिसळून गेले.
स्थळ: सगळीकडे ;
वेळ : ७ x २४
सुट्टीवर घरी असलो कि गजराच्या घड्याळाची गरज नाही लागत. शेजारच्या बिल्डिंग मधल्या शेखरच्या गाडीचा रिव्हर्स हॉर्न सकाळी ६ वाजता बरोब्बर जाग आणतो. ह्या वेळी त्यानी 'जय जगदीश हरे...' ची नविन ट्यून घेतलेली कळली... शेजारच्यांची निशा सकाळी स्कुटीवरून निघाली कि बिल्डिंग खालून जायी पर्यंत " पी sssss प .. पी.. पिप " असा हॉर्न वाजवते. " आई , मी गेले ग " आसा सांगायचं असतं ना तिला. आणि कोपऱ्यावरच्या बिल्डिंग समोरून जाताना बाल्कनीमध्ये उभ्या सागर ला उद्देशून " पिsss पी sssपिsss " आसा सांकेतिक... बाकी कॉलनी मधले इतरही वाजवतातच आपापल्या परीने त्यांचे त्यांचे हॉर्न ... पण सकाळ सुरु करणारे हे दोनच.
कोपऱ्यावर रिक्षा केली
आणि निघालो. " काही तरी आवाज येतोय हो दादा किरकिर..." थोडा वैतागून मी
विचारलं ... " हॉर्न बिघडलंय ... अडकून बसलाय. जाऊदे, काय आडतय ? भारी ए कि
हे ...मुद्दाम दाबायला लागत नाय... ऑटोमॅटिक वाजतय" उत्तर देत रिक्षा
वाला खिदळला... बाकी इतर रहदारीतल्या वाजणाऱ्या वेगवेगळ्या हॉर्नच्या
गदारोळात हा पण एक बारीकसा आवाज मिसळून गेला... खरखरणाऱ्या माईक
सारखा. सिग्नल ला तर चढाओढ लागलेली... कोण लांब आणि किती मोठा हॉर्न
वाजवताय त्याची... शेवटी एक फॉर्च्युनरवाला जिंकला... त्याच्या गाडीला
सायरनचा हॉर्न होता... मस्त! कसंकाय एवढं सुचतं ना वेगवेगळं. क्रीएटीव्ह असतात
लोकं... पुढच्या चौकात पाठीमागून तसाच आवाज ऐकू आला. आता रहदारीला माहित होतं कोण
आहे पाठीमागे. तसूभर पण जागा नाही मिळणार... असेल तुझ्या गाडीचा हॉर्न भारी... तो
सायरन बराच वेळ वाजत राहिला ... मग बंद झाला ... लोकांनी विजयी निश्वास सोडला आणि
सिग्नल सुटला... पाठीमागे इतका वेळ खरंच सायरन वाजवणारी ऍम्ब्युलन्स आता शांत झाली
होती... कदाचित आतील अत्यवस्थ परिस्थिती कायमची शांत झाली असावी... सायरन न वाजवता
ती हॉस्पिटल च्या दिशेने वाट मिळेल तशी शांतपणे निघून गेली... रहदारीत मिसळून
गेली.
स्थळ: कॉलनीत ; वेळ:
रात्री, खूप उशिरा
बारा एक ची वेळ
असेल ... जस्ट डोळा लागला होता... कोणी उशिरा घरी येणारा कॉलनी च्या बंद गेट पाशी
हॉर्न वाजवत दिवसभर दमून झोपलेल्या वॉचमन ला उठवत होता...चार पाच फ्लॅट मध्ये
फटाफट लाइट लागले. एकजण बाल्कनी मधून खेकसला " आरे ओ वॉचमन , गेट खोलो. सो
गया क्या? ... च्यायला ह्या झोपण्यासाठीच पगार देतो आपण ह्याला... गेट खोल रे
बाबा!!!" ... वाचमनने डोळे चोळत गेट उघडल...हॉर्न वाजवणारी गाडी सुळकन आत
शिरली आणि पार्किंग लॉट मधल्या इतर झोपलेल्या गाड्यांमध्ये मिसळून गेली...
दमलेला वाॅचमन गेट बंद
करून आपल्या केबिन मध्ये परत अंतर्धान पावला...
मी पण परत झोपेच्या
आधींन झालो... रहदारीलाही कधी तरी अच्छे दिन येतील असं स्वप्न पाहात.
***
प्रकाश केळकर
👌👌... शुभ दीपावली !
ReplyDeleteमस्त रे
ReplyDeleteAs usual, top class!
ReplyDeleteApt. You have put it in such a perfect perspective
ReplyDeleteWithin few seconds of waiting at traffic signal different thoughts and learnings too!!
ReplyDeleteछान आहे लेख वाचनीय आहे
ReplyDeleteस्थळकाळाची सुरेख सांगड घालत प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यासमोर आले...सुरेख
ReplyDeleteSatya paristhiti!!
ReplyDeleteSatya paristhiti!!
ReplyDeleteEvery day reality. Very well put.
ReplyDelete