बनमस्का ....

बनमस्का .... 

मी जे लिहीतो त्यात नेहमी भूतका डोकावतो...हो!!! नॉस्टॅल्जियात रमतो मी!!! 
आठवणींच्या दुनियेत हरवायला मला आवडतं ... आणि लिहायला मला ते र्तमानात.
थोड्या काळासाठी का होईना वास्तवापासून दूर जाण्याच आणि इतरांना तिथं नेण्याचं आणखी एक उत्तम साधन.

माझ्या लिहीण्यात मग अंगण पसरतं , चांदण दिसायला लागतं बकुळीचा सुंगधी सडा पडतो, बालपण डोकावतं, शाळा आठवते, कॉलेज कट्ट्याच्या आणि त्या स्वछंदी दिवसांच्या हलक्या फुलक्या आठवणी शेवरीच्या पांढऱ्या म्हातार्यांगत भिरभिरत राहतात.  

कट्टा !!!...  कट्टा तर नॉस्टॅल्जिया च्या सफरीतलं माझ अत्यंत जिव्हाळ्याच ठिकाण... उरापाशी जपून ठेवलेल...  किंबहुना तिथे कायमच गोंदलेलं एक सुंदर स्वप्नचित्र...

अजूनही आजूबाजूला कोणी शिलगावलेल्या सिगारेटच्या वासानं माझ्या कट्ट्यावरच्या आठवणींचा वणवा पेटतो आणि चहाच्या एका कपा बरोबर कधी त्यांचा महापूर येतो....  तासंतास घालवलेले ते कट्ट्यावरचे क्षण आजूबाजूला कोणी तरी दिलेल्या एखाद्या हलक्या शिवीने जिवंत होतात आणि टाळी साठी कोणा पुढे केलेला हात आपसूक जाऊन खांद्यावर विसावतो. 

मित्र म्हणजे सर्वस्व, and vice a versa.!  अशीच फक्त डेफिनिशन असलेल्या त्या दिवसांची आठवण कट्ट्याविना येणं अशक्य असतं .... ती जागी होताच मनातल्या गरमागरम पावा वर अलगद पडलेलं लोणी विरघळून त्याचा एक खमंग वास दरवळतो  ... 
आणि मग...  आठवणींचा हा बनमस्का माझ्या काव्यातून जागा होतो.

वाफाळत्या चहा बरोबर
नाॅस्टॅलजीया उफाळून येतो
अन् आठवणींचा बनमस्का 
अलगद काळजात विसावतो...

                                 डोकावतो काॅर्नरचा इराणी,
                                गप्पांचा अड्डामाव्याचा केक.
                                धुरांच्या वलयांमधे दिसत राहाते,
                                 शेअर केलेली छोटी गोल्डफ्लेक...

डाऊनलोड करून बघत राहातो,
त्या गप्पा विनोद मस्करी थट्टा.
मनामधल्या वाइड स्क्रीनवर,
दिसत राहातो जगलेला कट्टा...

                                  दरवळतो हा सुगंध अचानक
                                  आठवते ती धमाल सारी.
                                  गल्ली चुकल्या जीवाला मग,
                                  खुलवते डाऊन  लेन मेमरी...

... खुलवते डाऊन द लेन मेमरी!!!

***
प्रकाश केळकर 

Comments

  1. वा...तुझ्या लिहिण्यात भूतकाळ डोकावतोच पण त्याची आजच्या काळाशी खूप छान घातलेली सांगड मोहून जाते...

    ReplyDelete
    Replies
    1. maast. Sounds like mine...everybody's past.

      Delete
    2. “Manaatlya garam garam paawa war algad padlela loni virghalun...” Mastachhh !!!! Lahanpanichya tya aathwani pan ashya garam paawaashi ekroop zalelya lonyasarkhya ... naajuk, haluwaar japun thewlelya ... 😍

      Delete
  2. वा , बऱ्याच वर्षांनी कट्टा आठवला , सुंदर त्या आठवणी , आता सगळे आपापल्या वाटेवर पण खुणेची शिट्टी ऐकू आली की ते दिवस डोळ्यापुढे येतात

    ReplyDelete
  3. प्रकाश, तुझ्या लिखाणाची एक वेगळीच स्टाईल आहे. तुझी प्रतिभा, शब्दसाठा आणि व्यक्त होण्याची पध्दत, लाजवाब आहे. तुझ्यातला कवि, ह्या सदरात कधी दाखल होतोय, ह्याची वाट पाहातोय

    ReplyDelete
  4. मनातल्या गरमागरम पावा वर अलगद पडलेलं लोणी विरघळून त्याचा एक खमंग वास दरवळतो  ... sums it up so nicely... your writing style has an earthiness that is hard to find...keep it up!!!

    ReplyDelete
  5. सुंदर नेहमीप्रमाणे तुझ्या मधे असलेला कवी लेखकाच्या हातात हात घालून संचारलाय

    ReplyDelete
  6. सहीच!! सगळं एकदम डोळ्यांसमोर आले..

    ReplyDelete
  7. सुंदर लेखन कौतुकास्पद आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. मस्तच , फारच छान शब्दांकन .

      Delete
  8. सुंदर आठवणी सुंदर शब्दात! गल्ली चुकला जीव - अतिशय सुंदर प्रतिमा!!!

    ReplyDelete
  9. मस्तंच!! Reminiscing those days indeed!!

    ReplyDelete
  10. प्रकाश,
    भाषा, शैली सगळच सुरेख
    सगळ्यांना स्मरणरंजन करायला लावतोस
    मंजू

    ReplyDelete
  11. खूपच मस्त! पंचेंद्रियांची सांगड घातल्ये. हे म्हणजे त्या हॅरी पाॅटरमधवल्या लव पोशन सारखं आहे. लेखक imagination चाळवतो आणि वाचकाला त्याच्या मेमरी लेनमधले गंध, आवाज आणि रंग आठवतात. It become a very personal experience... सहीच.

    ReplyDelete
  12. अतिशय सुंदर लिहिले आहे

    ReplyDelete
  13. कट्टयावर बसुन ती आली की धडधड; गेली की निराषा हे पण खूप आठवत.

    ReplyDelete
  14. Bum maska ni khupach majja aanli. Apratim lihilay blog. Bun maska kharach aaplya jawalcha. Tyachya barobar down the Memory Lane Kayla awadla !

    ReplyDelete
  15. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  16. Amazingly potrayed .
    Katta outside my college with friends , good luck cafe chai with bun maska .. golden college days !
    A beautiful walk down the memory lane..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog