या जन्मावर या जगण्यावर... 


सकाळीच एक फॅंटसी मनांत डोकावली रोज जर फक्त  सकारात्मक बातम्या छापू लागले तर ? विचारानच मी सुखावलो आणि पेपर चाळता चाळता अजून एक बिस्कीट चहात बुडवलं... 

१२ मुलं आणि त्यांचा फुटबॉल प्रशिक्षक सगळे सुखरूप गुहेच्या बाहेर... अंगावर रोमांच उभं राहील बातमी वाचून.!!! 
अंधारात, दमट ओल्या,पाण्यानी तुडुंब भरलेल्या गुहेत चार पाच किलोमीटर आत कुठेतरी खबदाडीत जीव तगवत अत्यंतीक प्रतिकूल परिस्थीतीला घीरा नं सामोरं जावून एक नाही दोन नाही तर तब्बल पंधरा दिवस!!! 
जगण्यावर अतीव प्रेम असलेले ते बारा पंधरा वर्षांचे वीर आणि त्यातल्या त्यात वयानं मोठा असलेला त्यांचा तो 
पंचविशीतला गुरू!...   

स्वःताच्या जीवाची पर्वा न करणारे ते थाई नेव्ही कमांडो, विदेशी जाणकार केव्ह डायव्हर्स, अथक परिश्रम करणारे मेडीक्स, सैनिक,तंत्रज्ञ... त्याना उमेद देणारे असंख्य  कार्यकर्ते आणि दिवस रात्र सर्व सुखरूप होण्यास प्रार्थनेसाठी जुळेलेले जगभरातील लक्ष 
लक्ष हात... 

...जणूकाही सारं धैर्य , सारी उमेद, जिद्द, आणि पृथ्वीवरील सगळी मानवतां थायलँड च्या त्या दुर्गम प्रदेशात एकवटली होती... शेवट पण सुखांत...एखाद्या परिकथे सारखा... जिव ओला करणारा. 

उरलेला थंड चहा ,त्यात पडून विरघळलेल्या बिस्कीटासह मी बाजूला ठेवून इतर वर्तमान वाचायला लागलो... आणि काय आश्चर्य!!!... 
इतर सार्या बातम्या घुसर झाल्या...  नजरेस दिसायला लागल्या , फक्त आनंदी बातम्या... सकारात्मक!!

काय योगायोग!!!!...बाजूला चालू असलेल्या आय पॅडवरही गाण नेमकं लागलं होतं... 

“ या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे... शतदा प्रेम करावे.”

*****

Comments

Post a Comment

Popular posts from this blog