लॉकडाऊन मध्ये ...
विश्वाच्या ह्या खेळात,
निसर्गाने टाईमप्लीज म्हटलंय.
फक्त फरक एव्हढाच की,
मानवाच्या पालथ्या मुठीवर थुंकी लावून तो खेळ सोडून गेला...
आणि... आपण बसलोय बोंबलत,
तो कधी परत येईल ह्याची वाट पाहात...!!
गेले काही आठवडे एक वेगळाच प्रवास चालू आहे आपल्या सगळ्यांचा... पण ह्यातूनही खूप काही चांगलं अनुभवायला मिळतंय... ह्या दिवसात बरंच काही सुचलं, लिहिलं आणि अर्थातच सध्याच्या परिस्थितीला अनुसरून... सादर करतोय... काही सकारात्मक.
- १ -
माणसं भेटतायत
थोडीशी का होईना,
मास्क लावून असेना,
बोलतायत येतां जाता
...मनापासून
चेहेरे दिसतायत
अस्पष्ट असले जरी,
धुसर वाटले तरी,
मुखवट्यावीना पाहता
... दूरवरून
भावना पोचतायत
दोन हात दूर जरी,
हात हाती नाही तरी,
डोळ्यामधे भाव दिसतां
... भरभरून
आपले कोण कळतायत
घट्ट मिठी न मारून,
हजारो मैल दूर राहून,
शब्द ओले त्यांचे ऐकता
... येतंय भरून.
माणसं समजतायत आता... माणसं ... समजतायत आता.
************************************************************
- २ -
दिसायला लागलेत आता
उजळलेले अंघारलेले
बाघायचं ठरवलं तरी
एरवी कधी न पीहीलेले
घरातले सांदी अन् कोपरे.
पटायला लागलेत आता
परीचीत अपरिचित
ओळखीचे असले तरी
एरवी पाहून न पहीलेले
घरातले सांदी अन् कोपरे
एैकायला येतायत आता
कळत नकळत
आवाज त्यांचे एरवी
जरी मौन धरलेले
घरातले सांदी अन् कोपरे
पाहात होतो तेथे आजवर
जळमटं अन् धुळीचे ठसे
सांदी कोपर्यात त्या आता
दिसतायत स्वच्छ कवडसे...
दिसायला लागलेत आता....दिसायला... लागलेत आता.
*******************************************************************
घरी राहा... सुरक्षित राहा... काळजी घ्या ... हा पण काळ सरेल ... लवकरच सगळं पूर्ववत होईल.
प्रकाश केळकर
१ मे २०२०
अप्रतिम 👏👏
ReplyDeleteवाह खूपच छान
ReplyDeleteBeautiful!! So very true!!
ReplyDeleteSuperb!
ReplyDeleteThank you all
ReplyDeleteसुंदर!
ReplyDeleteClass. Very nicely written.
ReplyDelete