गोष्ट आनंदाची  

नुकतच वाचनात आलं...  कोणा शास्त्रज्ञांनी म्हणे एक प्रयोग केला होता. पिंजऱ्यातल्या उंदराला एकीकडे चीज आणि दुसऱ्याबाजूस एक प्याडलरुपी बटण ठेवलं. उंदराच्या मेंदूत वायरने काही इलेट्रोड्स सेन्सर्स जोडले, प्याडल दाबलं कि मेंदूमध्ये कृत्रिम आनंदी संवेदना निर्माण करणारे. पिंजऱ्यातल्या त्या  उंदरांने एकदा प्याडल दाबलं आणि मग पुनःपुन्हा दाबतंच राहिला. ती आनंदी संवेदना त्याला सुखावत आसणार. चीजकडे तो फिरकलाच नाही. वास्तविक चीजच्या चाव्यातून तीच आनंदी संवेदना त्याला मिळत असावी. पण प्याडलच्या दाबण्याने आपोआप मेंदूत  मिळणाऱ्या आनंदात तो सुखावत गेला आणि शेवटी उपासमार होऊन मरून गेला. 

कशाच्या तरी मागे आपणहि असेच पळत असतो. काहीतरी कृत्रिम आनंद देणाऱ्या आशाच एखाद्या बटणावर आपला पाय कधीतरी नकळत पडतो आणि त्याचाच हव्यास जडतो. खऱ्या आनंदाच्या गोष्टी मागे पडतात आणि मग व्हायचा तोच परिणाम होतो. रॅटरेस ह्यालाच म्हणतात का? असेलही. पिंजऱ्यातल्या उंदरात आणि ह्या शर्यतीतील प्राण्यांमध्ये फारसा फरक नाहीये म्हणा.  आपल्याला  अशी बटणे वारंवार दिसत राहतात आणि आपण ती दाबत राहतो किंबहुना आपण उड्या मारतच असतो आणि येणाऱ्या बटणांवर पाय आपोआप पडत असतो ... आनंदाच्या नवनवीन संवेदना मिळवत जातो आणि त्याच्या व्याख्या पण सतत अपडेट करत राहतो. लठ्ठ पगाराची नोकरी, सुस्वरूप जोडीदार, मोठं स्वतःच घर, हुशार गुणी मुलं अशी ह्या बटणांची संख्या वाढतच राहते आणि आनंदाच्या व्याख्येची व्याप्ती रुंदावत जाते... नवीन बटणांचा हव्यास वाढत जातो आणि आपण धावपळ करत राहतो. 

गोष्ट माझी, सर्वांची 
आनंदाच्या क्षणांची. 
 
सुरुवात कुठे? शेवट कधी? 
काहीच तसं नाही कळत ! 
सुखी होण्याच्या नादामध्ये
उपासमार मात्र नाही टळत.

मिळून गेल एक सुख  
शोध काही संपत नाही 
अजुन पुढे असेल म्हणत 
धावणं काही थांबत नाही 

मिळालेले क्षण सुखाचे 
कोणीच कधी बघत नसतो 
ग्रॉस डोमॅस्टिक हॅपिनेस  
सतत मात्र मोजत बसतो. 

गोष्ट तुमची माझी सर्वांची 
 न संपणारी कापूस कोंड्याची. 

***

Comments

  1. प्रकाश कमाल
    असाच एक कापूस कोंड्या

    ReplyDelete
  2. छान एक्सप्रेशन प्रकाश!

    ReplyDelete
  3. वाह क्या बात है संकल्पनाच इतकी सुंदर आहे की तुझी उत्तम कवित्व त्यासमोर फिकी वाटते

    ReplyDelete
  4. Loved it...the true reality of today

    ReplyDelete
  5. Tifa - The Tifa Factory
    Tifa 2019 ford ecosport titanium - The Tifa titanium drill bits Factory. Tifa titanium rings for men was developed with the help of Tifa Productions in the production of Tifa's titanium straightener first ever 제이티엠허브출장안마 high-speed racing car

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog