पिट स्टॉप ...
तशी ७५ मैल वेगाने धावणाऱ्या शिस्तबद्ध शहाण्या गाड्यांच्या एकसंध रांगेतून थोड बाजूला होत गाडीने अलगद उजवीकडे सुबक वळण घेतलं आणि गॅस स्टेशन रेस्ट एरियाच्या भल्याथोरल्या जागेत कोपऱ्यातल्या मॅकडोनाल्ड जवळ येऊन थांबलो... २ तास गाडी चालवून आलेला शीण घालवत दुमडलेल्या पायांना मोकळ कराव आणि जमलंच तर एखादा हलकासा सँडविच आणि बरोबर थंडगार कोक रिचवावा, ह्या इराद्याने....
इथल्या हमरस्त्याकडेच्या अश्या जागी असते तितपतच आजूबाजूला तुरळक गर्दी... एक भल्याथोरल्या अंगापिंडाचा, डोक्याखाली माझ्या मांडी एवढी गर्दन राखलेला आणि तेवढ्याच अवाढव्य गाडीतून उतरलेला लाल गोरा देह, एका छोट्या गाडी मधून पायउतार झालेल चिनी कुटुंब आणि दूरवर कोपऱ्यात उभे राहून टवाळक्या करणारं चार कृष्णवर्णी पोरांचं टोळकं ...बस! एवढीच माणसं. पेट्रोल भरायला पण आपला हात जगन्नाथ त्यामुळे तिथंही कोणी नाही. तरी टळटळीत दुपारी ३ ची वेळ. एरवी रात्री इथे किती राबता असेल देवच जाणे. आमच्याकडे पेट्रोल स्टेशन आणि हायवेकडेच खाण्याचं ठिकाण म्हटलं की रस्त्यावर वर्दळ असते तेवढीच तिथंही गर्दी ... बारामहिने चोवीस तास... ( मुंबई पुणे एक्सप्रेसवेला दत्त फूड तर कसं गच्च भरून ओसंडून वाहत असतं. असो ... आपल्याकडची गोष्टच वेगळी!). मॅकडोनाल्ड चा दरवाजा ढकलत पाठीमागून येणाऱ्या लाल गोऱ्या मानेच्या देहाला मी स्मित हास्य करून उगीचच संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मी उघडलेल्या दरवाजातून आत जात त्याने थँक्स म्हटलं ... बास एवढच!... मला नेहमीच मोठ्या देहाच्या बलदंड लोकांच दडपण वाटतं. तसच काहीसं झालं. त्याच्या सारखे मग्रूर भाव ( सॉरी... एटीट्युड) ठेवून आपल्याला कधी राहता येईल का ह्याचा विचार करत मी काउंटरजवळ सरकलो. आत्ता खायला एक आणि नंतर गाडीत खायला दुसरा असे दोन बर्गर आणि एक मिडीयम साईझ कोक सांगितला. ऑर्डर घेणाऱ्या बाईचा एकही प्रश्न न कळल्याने सगळ्याला येस येस म्हणून मन डोलावली आणि आता पुढ्यात काय येणार ह्याची चिंता करत पैसे चुकते केले. सॅन्डविच आणि कोकचा पेला देता-घेताना " हियर यु गो..." ... " थँक यु" ... " यु वेलकम ..." ह्या तीन ठराविक वाक्यांची देवाणघेवाण झाली... ह्या पलीकडे अमेरिकेत फारसा संवाद घडत नाही हे माहित असल्याने निमूटपणे गाडीकडे निघालो. ( दत्त फूडची परत जाम आठवण झाली ... किती मस्त संवाद करावा लागतो तिथे... कुपन घेण्यापासून ते वडापाव साठी एक्सट्रा चटणी घेई पर्यंत दहा बारा वाक्य सहज दिली घेतली जातात ... असो!) ... मगाशी लक्षात न आलेली अजून एक व्यक्ती बाहेर पडताना रस्त्याकडेच्या कोपऱ्यात दिसली. आजूबाजूला दोन मोठ्या भरलेल्या ट्रॅश ब्याग आणि एक भली थोरली बॅकपॅक बाळगत केसाच्या झिंज्या वाढलेली, अंगभर मळलेली जीन्स आणि जुनाट मळकट लेदर जॅकेट घालून बसलेली एक मध्यमवयीन स्त्री आणि तिच्याजवळ निमूटपणे पुढच्या पायांवर डोकं टेकून पहुडलेलं तिचं कुत्रं... दोघेही निर्जीव डोळ्यांनी बसलेले ... भावनाहीन चेहऱ्यांनी , कुठेतरी अज्ञातात नजर लावून... भूतकाळ ओरबाडला गेल्याचे आणि भविष्यातला अंधार सांगणारे भाव तिच्या चेहेऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये मला लपल्यासारखे वाटले ... हलणाऱ्या छातीच्या भात्यात मात्र वर्तमानाचा श्वास घेणारी जाणीव दिसत होती. तिचा कुत्रा निदान शेपटीने माश्या तरी वारत होता पण हिला त्याचंहि भान नव्हतं... काय असेल हिचं आयुष्य? इथे होमलेस पीपल म्हणून ओळखतात त्यातली असेल का हि? इथल्या थंडीवाऱ्यात काय होत असेल? काय झाला असेल हीच नक्की ?? एक ना अनेक असंख्य प्रश्नांनी डोक्यात काहूर माजलं... खरंतर रस्त्याकडेला बसलेले भिकारी पाहायची आपल्या नजरेला सवय झालेली ... पण हे वास्तव माझ्या नजरेला ... इथे ह्या वातावरणात, सुबत्तेच्या, आजूबाजूला सुखानी भरभरून ओसंडून भरलेल्या देशात, जरा जास्त खुपलं. घेतलेल्या बर्गर मधला एक मी तिच्या पुढ्यात नकळत ठेवला आणि मागे वळून न बघता गाडीत बसलो... उरलेल्या दुसऱ्या बर्गरचा घास घेऊन गाडीला स्टार्टर मारला... थंडगार बर्फाळ कोकचा घोट घेत आरशात पुन्हा तिला पाहिलं ... मी दिलेल्या बर्गरचा एक भाग कुत्र्याच्या पुढ्यात ठेवून तिने उरलेला बॅकपॅक मध्ये कोंबला... पसरलेले पाय जवळ घेतले, जवळ पडलेल्या सिगारेटच अर्धवट थोटूक पेटवून ती भल्यामोठ्या सोडलेल्या धुरातून पुन्हा नजर लावून बसून राहिली होती... आधांतरी... कुठेतरी.
मी एक निस्वास सोडून रिव्हर्स टाकला ... सुबक वळण घेऊन माझी गाडी मार्गाला लागली... पुन्हा एकदा त्या शिस्तबद्ध रांगेत... भविष्याकडे खेचून नेणाऱ्या.

Human mind and emotions are relatable across the globe and cutting across all the type of differences!!
ReplyDeleteExcellent.. was missing your blogs. Keep writing man
ReplyDeleteYour writing transported me to the place you described so vividly...the way you described the old lady and her dog...simply fantastic!
ReplyDeleteKeep writing!
Wonderful as usual. Refreshing! Keep writing!
ReplyDeleteछान लिहीतोस !
ReplyDeleteसुंदर! 👍
ReplyDelete