साहित्याची ठिकाणं
माझ्या आधी बसलेल्या गिऱ्हाईकाची कटींग संपवून न्हाव्याने त्याची दाढी घोटायला घेतली. मला थोडं बर वाटलं. माधुरीवर कव्हर फिचर असलेला तो फिल्मफेअरचा अंक माझा पूर्ण चाळून झाला नव्हता. त्याची दाढी उरके पर्यंत काही अजून फोटो डोळ्या खालून घालता येणार होते. ( खरं तर डोळे भरून पाहाता येणार होते). थोड्याच वेळात सीट झटकत मला बसायचा त्यांने इशारा केला. उठताना माझ्या चेहेऱ्यावरची नाराजी त्याला दिसली असावी... फिल्मफेअर घेवून बस म्हणाला आणि पडत्या फळाची आज्ञा मानत मी माधूरीला घेवून कटींग साठी विराजमान झालो.
तर हे असं आहे. प्रत्येक पुस्तक, साहित्य, वांग्डमयाचं आपलं आपलं एक ठिकाण असतं. नाहीतर एरवी फिल्मफेअर विकत कोण घेतय? न्हाव्याकडे बसल्यावरच फिल्मफेअर पासून फेमिना आणि व्होग वगैरे चाळण्याची संधी. इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या काळात तसंही हे अंक पाहाणं दुर्मिळ झालंय... मात्र केशकर्तनालयात हमखास. त्यां ठिकाणाचं आणि ह्या साहित्याचं जसं हे एक पुराणकाळापासूनचं नातं.
इंद्रजाल काॅमिक्स रेल्वे स्टेशनच्या बुकस्टाॅलवरच दिसायची.फिल्मी गाण्यांचे शब्द डाऊनलोड होण्याच्या आधीच्या काळात छोट्या छापील पुस्तिकेच्या रूपात पानाच्या ठेवल्यावर हमखास मिळायचे. आजचे राषीभविष्य वाचायची खुमखुमी एस्टी स्टॅंडवरच्या बुकडेपो मधूनच पूरी व्हायची आणि फुकट बातम्या वाचायची इच्छा इराण्याकडे लाकडी दांडीला टांगलेल्या वर्तमानपत्रातून पूर्ण व्हायची.
लायब्ररीत जावून पुस्तक वाचण्याचा नाद फारसा कधी नव्हता पण कधी आलाच योग तर साहित्यापेक्षा तीथल्या शांततेचाच जास्त वचक वाटायचा. भलं थोरल पुस्तक कपाटातून काढून ग्रंथपालाच्या नाकावरील चष्म्यावरच्या कौतूकमिश्रीत संशयीत नजरेला नजर नं देतां दूरच्या टेबलापाशी बसून वाचायची संधी फक्त तीथेच मिळायची. वजनदार ग्रंथांचं ठिकाण म्हणजे काॅलेजची लायब्ररी हे समिकरण तेव्हाच डोक्यात फिट झालं. साहित्याच्या गोडीपेक्षा दुसरीच कोणाचीतरी लागलेली गोड ओढ त्या ठिकाणी घेवून जायची... असो! तो विषय आत्ता नको.
रस्त्यावर मांडलेल्या सस्त्यातल्या जुन्या पुस्तकांना नेहमी फुटपाथ हेच ठिकाण. घासाघीस करून तेथून घेतलेल्या इंग्रजी कादंबऱ्या माझ्याकडे अजूनही दिमाखात कपाटात उभ्या आहेत. अचानक दोन पाच रूपयांत मिळणारी दुर्मिळ पुस्तक तर ह्या ठिकाणांची खासीयत.रस्त्यावरती आलेलं अजून असंच काही साहित्य फुलवाल्या कडून आणलला हाराचा पुडा सोडवल्यावर अचानक गवसायचं. आणि मग जून्या दिवाळी अंकातली पानं वापरून बांधलेल्या पुड्यातलं ते रद्दीत गेलेले साहीत्य पुन्हा जिवंत व्हायचं.
अलीकडच्या काळात सुध्दा आहे एक साहित्याचं नविन ठिकाण. दुकानात उपलब्ध नसलेलं आणि नविन आवृत्ती न छापलेलं एखाद
पुस्तक असच अचानक इंटरनेट वर सापडत आणि अमेझॉनवर विकतही मिळतं...विज्ञानाचा विजय असो!
साहित्य आणि ठिकाणांच्या अशा कीती एक आठवणी आणि घट्ट जुळेलेली नाती. अजूनही बरीचशी ठिकाणं तशीच आहेत आणि साहित्य पुरवत आहेत... बुकस्टाॅल पासून लायब्ररी पर्यंत आणि फुटपाथ पासून अमेझॉन पर्यंत.
***
प्रकाश केळकर

छान
ReplyDeleteMasta lihilay. As usual...
ReplyDeleteमस्त। आठवणीतल्या गल्लीतली सहल 👏👏
ReplyDeleteअजून एक ठिकाण आठवतं ते म्हणजे पस्ती वाल्या चे दुकान किमतीचा अंदाज नसल्याने आपल्याला अत्यंत दुर्लभ व दुर्मिळ पुस्तक अगदी वजा किमतीत मिळतात. अजूनही मी निनाद व मल्हारला पस्तीवला कडे नेले कि ते खेळण्याच्या दुकानात आल्यासारखे खुश.. आणि मी शंभर दोनशे रुपयात भलीमोठी पुस्तक घेऊन खुश😂😂
इंटरनेटवर्ती पुस्तक वाचणे किंवा किंडल घेणे अजून विचारात नाही, कारण त्याला हाताने हाताळण्याची सर येईल, शंका वाटते?