Posts

Showing posts from December, 2018
हॅपी   " ३१ डिसेंबर ते २ जानेवारी ..." " उद्यापासून रे उद्यापासून , बघच तू .."... इथपासून ते आगदी .. "... उद्या ssss पा ss सून या sss र .. बघ तू sss....".. इथपर्यंत वचन , प्रतिज्ञा , आणाभाका आणि इतर बरच काही घेऊन मध्यरात्र उलटलेली असते … “ उद्यापासून यू ssss   वील सी sss द डिफरंन्स इन मी ssss "... उत्तररात्री वर थोडा इंग्रजीचा ( खरंतर जरा जास्त झालेल्या " इंग्लीश " चा   )   अंमलही चढायला लागलेला असतो ... ऐकणारा मित्र पण तेवढ्याच आवेगात आणि शक्यतो खूप लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करून मान डोलावत सहमती साठी टाळी देत असतो ( सांगणाऱ्याच्या हातावर ती न पडता )   ... एकंदर काय तर ब्रम्हानंदी बऱ्याच टाळ्या वाजल्यानंतर त्या रात्रीची ती   ३६५ दिवसांची कहाणी १ जानेवारी ला पहाटे सफल संपूर्ण होते …" उद्यापासून अमुक अमुक बंद "... ते ... " तमुक तमुक सुरु करतो .." ... आणि " हा आता शेवटचा झुरका ..." ... पासून ते ...   " उद्य...
" ________ " घरट्या   मधून इतके    दिवस हळूच डोकावणार ते पिल्लू आज सकाळी अचानक फांदीवर आणि   फांदीवरून फरशीवर आलं.....डोळे फाडून आबा बघत राहिले...कळेना ह्याला   अचानक काय झालं ?  गेले काही दिवस बारीक चिवचिव करताना दिसणारा तो इवलासा जीव... रोज बघत होते ,  त्याची   धांदल आणि त्याच्या आई-बाबांची    ची   पण.  नवीन पदार्थ घेऊन   चोचीतून भरारी मारत फांदीवर येऊन बसणारी बुलबुल ची मादी आता गेले काही दिवस मोठे   किडे ,  नाकतोडे आणून भरवत होती आणि कधी थोडी हिम्मत करून खिडकीजवळ ठेवलेला   ब्रेडचा तुकडा सुद्धा...    मस्त   चाललं   होत बाळ बुलबुल आणि त्याच्या आई- बाबांचं....आणि  आज अचानक तो  पिसं  फुटलेला इवलुसा गोळा आपली छोटी चोच वासून फरशीवर   उतरला....काय झालं ?  घरट   तुटल कि काय ?  का त्या कावळ्यांनी काही उद्योग केलाय   दुष्टपणाने ?  उचलून घेऊया का ?  काही तरी झालय त्याला...पाणी पाजून   पाहूया... तेवढ्यात भिंती वर बसू...
Image
… बंदिस्त भावमुद्रा … माझी फोटोग्राफर मैत्रीण नेहा वैद्य नुकतीच  नागालँड च्या दौऱ्यावर जाऊन आली... तिच्या अप्रतिम " eye behind the camera " ने टीपलेले क्षण मला नुकतेच पाहायला मिळाले ...   ईशान्य     भारताचा हा भाग निसर्गसमृद्ध आहे. त्या सुंदर स्थळांचे तिने काढलेले फोटो उत्तम आहेतच ... पण तिने आपल्या कॅमेऱ्यात पकडलेले काही चेहेरे मला  विशेष भावले... त्यातल्याच ह्या काही "बंदिस्त भावमुद्रा" ... नेहा च्या कॅमेऱ्यातून आणि माझ्या शब्दात.  लोकरीच्या गुंड्याभोवती विणलेला बारीक वाणीचा सुरेख स्वेटर आहे हा. “bundle of joy” चा खराखुरा प्रत्यय देणारा “ आनंदी गुंडा”.. डोळे सदृश फटींमधून ओसंडून वाहाणारे त्याचे विस्मयकारक भाव, लाल गोऱ्या गोबऱ्या गालात दडलेलं आणि सुंदरश्या नाजूक जिवणीतून हळूच निसटू पाहाणारं हासू आणि बाहेर पडणारा हुंकार फोटोमधे बरोब्बर पकडला गेलाय... मर्फिच्या जाहीरातीतल्या बाळा पासून ते कुठल्याश्या दुधडेअरीच्या कॅलेंडर वरील दही चाटणार्या बाळकृष्णापर्यंतच्या सगळ्या आत्तापर्यंत पाहीलेल्या गोंडस बाळांची आणि मनांच्या हार्ड...