" कलायडोस्कोप "
जुन्या फोटो चा आल्बम शोधायला माळ्यावरच्या ट्रंके चा तळ उपसत होतो आणि हाती त्याहूनही काहीतरी मौल्यवान गवसलं... "सुवासिक मोगरा"... बाहेरच्या बाजूचे लेबल पिवळट काळपट पण आजूनही स्पष्ट दिसत होत.... उदबत्तीचे ते जुने षटकोनी नळकांडे एका क्षणात ओळख पटवून गेलं... शाळेत असताना बनवलेला माझा कलायडोस्कोप ..!!... त्यातल्या बांगडीच्या काचा आजूनही तशाच सुंदर सुंदर दिसत होत्या आणि फिरवताना होणारा त्याचा किणकिण आवाज पण... नळकांडी च्या समोरील काचेतून अंधुक प्रकाशात फिरणारे ते बांगड्यांच्या तुकड्यांचे भौमितिक आकार मला भौतिक जगातून उचलून मागे कुठे तरी घेऊन गेले... टाइम मशीन नेतं ना काळाच्या पुढे किंवा मागे ...तसंच. त्या वस्तूशी जोडलेल्या असंख्य आठवणी... हळूहळू काचांचे तुकडे धूसर होत गेले आणि आठवणींची नक्षी फेर धरून नाचायला लागली... ... आणि मग रंगून गेलो मी त्या रंगबिरंगी षटकोनी विश्वात... खरं काय शोधत होतो ह्याचा विसर पडून...!!!
जुने अल्बम, FM वर लागलेल गाणं,खाण्यात अवचित आलेला एखादा पदार्थ किंवा कोणीतरी बोलताना पटकन केलेली एखादी कॉमेंट, विशिष्ट परफ्युम चा वास आश्या एक ना अनेक गोष्टी आपल्याला ह्या टाइम मशीन सारख्या कुठेतरी खेचून नेत असतात. त्यांच्या तश्या असण्याचं आणि त्या अचानक मध्ये मध्ये डोकावण्याच काही तरी एक ठरलेलं गणित असावं प्रत्येकाच्याच बाबतीत. मला तर हे मागे खेचून नेणारे क्षण पदोपदी भेटत असतात. मग त्यातून चांगल वाईट उदास सुखद आल्हाददायक कश्याही आठवणींचा महापूर येऊदे. तो हवाहवासा वाटतो हे मात्र खरं...
रात्री दहा अकरा च्या वेळी रफीचं गाणं ऐकू आलं कि, रेडिओ वर "बेला के फुल" ऐकत अभ्यास करत असल्याचा फील येतो...खिचडी पापडा चा खमंग वास स्वैपाकघरातून आला कि ट्रेक चे दिवस सभोवती वाऱ्यासारखे घोगावतात... आणि अजूनही कुठे पट्टी पहिली कि शाळेत उलट्या हातावर पडलेल्या फटक्यांचे वण दुखायला लागतात. रोजा सिनेमातलं गाणं कुठे गाडीत बसल्यावर लागल कि मला अजूनही मागे झालेल्या एका भयानक अपघाताच्या गर्तेत परत ओढतं ... तर कुठे अचानक आलेल्या इंटिमेट सेंट च्या मंद सुगंधानं माझ मन कॉलेज मधल्या दिवसांत रेंगाळत.
ह्या अश्या आठवणी ट्रिगर करणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी हा आपल्यातला दडलेला कलायडोस्कोप फिरवत राहतात... सतत. आणि मग आपण पाहत राहतो ती नक्षी... कधी छान कधी भेसूर ... पण बरेचदा सुंदर ... ... रंगून जातो त्या रंगबिरंगीविश्वात... काय शोधत होतो ह्याचा विसर पडून...!!!
काळजाच्या खोल आत
सर्वांच्याच मनात ...
असतो असाच दडलेला
कधीतरी घडवलेला...
आठणींचा एक खोप.
कलायडोस्कोप ...कलायडोस्कोप!
***
प्रकाश केळकर
मस्त
ReplyDeleteत्या आठवणीच पुढे खूप सुखावतात , मित्रा मस्त रे
ReplyDeleteछान लेख पण अजुन उत्कठंता वाढवता आली असती , तसा प्रयत्न कर कारण वाचक तसा विचार करतो.
ReplyDeleteपक्या मस्तच रे
ReplyDeleteApratim ! !! Kharay tuza mhanana .. Manatle kaleidoscopes. Chhan chhan aathwani jagya hotat... The mesmerizing moments of life
ReplyDeleteEveryone has his own images in his kaleidoscope, so enjoyable. Well written pk
DeleteMasta
ReplyDeleteBahut baddhiya PKay sir
ReplyDeleteवा प्रकाश! तू अगदी सहज बालपणात जातोस आणि आम्हालाही नेतोस!
ReplyDeleteThank You All...
ReplyDelete