"ग्लोबल
,३…,२…,१…०
"
३… , बार्सिलोना, वेळ: दुपारी
२ वा ....
वाईन पास्ता च्या मंद
सुगंधात आणि बियर
च्या ओसंडून वहाणाऱ्या उत्साही वातावरणात
त्या तिघीं कोपऱ्यातल्या टेबलवर बराच वेळ
अड्डा टाकून होत्या…
गेल्या २ तासात
बरेच वाईन ग्लास
संपवून त्यांच्या आवाजाला चढलेली
धार आणि मधूनच
लागणारी खोकल्याची उबळ गप्पांना
रंग भरत होती.…
आजूबाजूच्या टेबलाना त्यांच सोयर
नव्हत आणि आपल्या गप्पाष्ट्कांचे सुतक
इतरांना लागेल हे त्या
तिघींच्या खिसगणतीतही नव्हतं. प्रत्येकीच
आपापलं पाकीट संपवून आता
त्या तिघीत एक
सिगारेट फिरवे पर्यंत पोचल्या
होत्या…. गेल्या दोन तासात धुराच्या
ढगांमध्ये त्यांच्या सुरकुतलेल्या चेहेर्यावर
उमटणारे भाव मात्र
त्यांच्या बोलण्याचा विषय स्पष्ट
सांगत होते. कपाळावर
कमीजास्त उमटणार्या प्रत्येक आठी
मध्ये सांगणारीच्या सुनेचे
गुण अवगुण दिसत
होते … अखंड गप्पा
मारून, थरथरत्या हातान वेटर
ला टीप ठेवत
आणि रिकाम सिगारेट
पाकीट चुरगळून टाकत
त्या तिघी डुलत
डुलत निघून गेल्या…समोरच्या गर्दीत विरळ
झाल्या ... धुरांची
वलय मागे ठेवून.
२…, इस्तंबूल, वेळ: सायंकाळी
५ वा....
टर्किश कॉफी आणि
शीशा च्या त्या
आड्यावरची सारी टेबलं
ओसंडून वाहात होती. कॉफीचा
दरवळ , शिशा च्या
धुराचा संमिश्र सुगंध आणि
वेगवेगळ्या चढउतारांच्या आवाजातील गप्पाना ऊत
आला होता. दिवसभराचे
ऑफिस आटोपून दोन
चार घटका टेकायला
आलेली सगळी मंडळी...
ते तिघे आजपण
नेहमीच कोपऱ्यातील टेबल पकडून
होते. शिशाच्या फुलवलेल्या
निखार्यांवर बसलेली पंढरी राख
एकाने टिचकीने उडवली
आणि एक मोठा
दमदार झुरका मारला…शिशा च्या
पाण्यातून आलेला गुडगुड आवाजाबरोबर
आलेली बारीकशी खोकल्याची
उबळ दाबत तो
बसक्या आवाजात बोलत राहिला…
सत्तरी कडे झुकलेली
पंढरी कोरीव दाढी
कुरवाळत बाकी दोघ
शांतपणे ऐकत होते….
अधूनमधून दुसरा विचारत
होता… आणि तिसरा
फक्त बारीक डोळ्यांच्या
फटीतून बघत, ऐकत
होता. त्याच्याही दोन्ही
मुलांनी त्याला बिझनेस मधून
उचकटून अलगद बाजूला
केल आसणार. म्हणूनच
तो आरपार फक्त
पाहत होता, हे
सगळ आधीच त्याच्या
बाबतीत घडून गेल
असल्यासारखा… बाकी दोघ
बोलत रहिले… उशिरा
पर्यन्त. वेटर ने
खुर्च्या उचलायला सुरुवात केल्यावर
ते तिघे उठले
... घरी जायला … आजून तिथून
तरी त्यांना कोणी
जा म्हणणार न्हवतं...
तो पर्यन्त.
१…, पुणे, वेळ: सायंकाळी
७ वा ....
"जेष्ठ
नागरिक संघाची बैठक आणि
कार्यक्रम आज थोडा
जास्तच लांबला म्हणायचा, घरी
पोचे पर्यंत अजून
आर्धा तास तरी
आहे . परत सिरियल
बुडणार आज.. कथेतील
कंटिन्यूटी जाते बाई"
… देशपांडे आजी स्वताशीच
पुटपुटल्यागत बोलत
होत्या आणि आजोबा
फक्त मान डोलावून
दुजोरा देत होते…
तस ते ऐकून
मान डोलावतायत का ती
आपोआप हलते आहे
हे कळायला मार्ग
नव्हता... "मान
हल्ली जरा जास्तच
हलायला लागलीय , औषध बदलून
पाहायला हवय"…. आजीनी परत
स्वताशीच बोलत स्वतःला
बजावून घेतल… " पण आदित्य
ला होईल का
वेळ दवाखान्यात जायला?
तो पण किती
बिझी आसतो हल्ली.
गेल्या रविवारी थोडा वेळ
काढला त्यांन पण
मग चिन्मय ला
सोडायला जायला लागल मित्रा
कडे वाढदिवसासाठी. ते
जास्त महत्वाच बाबा…
औषध काय पुन्हा
मिळतील "… देशपांडे आजोबांनी ह्या
शेवटच्या वाक्याला मात्र मान
हलवत आजींकडे वैतागाने
पाहिलं…. " आहो, देवळात
टेकुया का
मिनिटभर?" आजीनी विचारलं आणि
दुजोरा म्हणून आजोबांनी रस्ता
क्रॉस करायला सुरुवातही
केली.…. " बाहेर बाकावर असतीलच
बसलेले तुमचे जोशी
, म्हसकर आणि कुलकर्णी...
तुम्ही बसायला जाऊ नका फार
वेळ नको घालवायला.
उशीर झाला तर
आदी , चिनू आणि
सुनबाई जेवून घेतील आणि
मग उद्या सकाळ
शिवाय दिसणार नाहीत....
ऐकलंत ना, काय
सांगतेय?"… मान हलली
नाही पण आजोबांनी
वर केलेला हाताचा
पंजा आजींना सांगून
गेला कि कळतंय,
ठावूक आहे त्यांना…
तेही बोलत होतेच,
स्वतःशी मनातल्या मनात... " चिनूला
आवडतं आजी बरोबर
झोपायला.तिने गोष्ट
सांगत त्याला उशिरापर्यंत
थोपटायला.पण त्यांची
आई म्हणते मग
उशीर झाला कि
सकाळी शाळेसाठी उठायला
कटकट करतो. म्हणून नाही तो
झोपत आताशा आजीजवळ
… पण आपण वेळेत
पोचुया म्हणजे भेटेल…"...
बाकावर नेहेमीची कट्टा मंडळी
नव्हतीच आणि आजींची
भुणभुणहि वाढल्याने आजोबाही जायला
निघाले… त्यांच्या लाडक्या चिनू
साठी त्यांनी देवळातला
एक बत्तासा घेऊन
खिशात जपून ठेवला…
घरी हळूहळू पोचे पर्यंत
थोडा उशीर झालाच.
टेबलावर दोघांच्या जेवायच झाकून
ठेवून सुनबाई चीनूबरोबर
बेडरूम च्या बंद
दारा पलीकडे पोचली
होती... आदीने फोन
वर मित्राशी बोलत
बोलत समोरच दार
दोघांसाठी उघडलं आणि तोही
आत अंतर्धान पावला… आजींच
त्याला ते विचारयच
परत राहूनच गेलं
…उद्या औषध बदलून
आणायला जमेल का
ते.
०…, वृद्धाश्रम, वेळ : नेहमीचीच...
सकाळपासूनची.
करकरणार गेट वाचमनने
उघडलं … त्याचाच काय तो
आवाज झाला...तेवढाच.
बाकी सगळीकडे सकाळची
शांतता ठासून भरलेली .… आश्रमाच्या
बसक्या इमारतींच्यात तो पिंपळ
तेव्हढा उंच उठून
दिसणारा … त्याच्या पाराजवळच्या बाकड्यावर
नेहमी प्रमाणे सगळे
बसून होते… रस्त्याकडे
पाहात. समोरच्या
बागेमधील फुलांचे ताटवे बघत
छान वेळ जातो.
आता रस्त्यावर रहदारी
सुरु होईल. शाळेची
बस पण येतेच
पाठोपाठ , छान छान
युनिफोर्म मधली ब्यागा
घेतलेली बच्चे मंडळी उतरतील
शाळेत शेजारच्या जायला
. मग अजून थोडा
वेळ छान जाणार…
त्यांच्याकडे पाहात.
रस्त्यावरची
गर्दी तुरळक झाली.
फेरीवाले, भांडी कल्हईवाले, भंगारवाल्यांनी
दुपारच्या वैराण वेळेत घातलेली
साद ऐकू येत
होती … पिंपळावरून गरगरत पडणारा
पाचोळा उडणाऱ्या धुराळ्यात मिसळत
होता … दुपारचा वेळ थोडा
रेटत जाइल आता
…शेजारच्या शाळेची मधली सुट्टी
ची घंटा वाजली.
डबा खाणारी , ग्राउंड
मध्ये हुंदडणारी वानरसेना
दिसेल. त्यांच्या कडे बघत मग
संध्याकाळची वाट पाहायची.
शेवटची घंटा झाली.
चिवचिवत मुलांचा तांडा बसमध्ये
शिरला. भुर्रकन निघून पण
गेला … कामावरून परत जाणारे
आई बाबा आता
भाजी वैगरे घेवून
थोड्यावेळात घरी पोचतील.
मावळतीचा संधिप्रकाश आश्रमाच्या इमारतीमागे
जमा झाला. संध्याकाळची परतलेली पिंपळावरच्या
घरट्यांमधली जनता
थोडावेळ कोलाहल करून चिडीचूप
झाली … आता शांतता
पसरेल... अंगावर येणारी.
बाकावरची मंडळी अजून तशीच
होती…. मिटीमिटी डोळे उघडून
बसलेली, अंधारातून पाहत... धुकं
पडल्यासारखा वाटतंय, बाहेर गारठाहि
वाढलाय जणू … हळू हळू
एक एक जण
उठायला लागलं… कोणीच कोणाशी
काही न बोलता , नजरेन एकमेकांना
" गुड नाईट" म्हणत , धुकट,
डबडबलेल्या...शून्यात हरवलेल्या डोळ्यांनी.
करकरणार गेट वाचमनने
लावून घेतलं … त्याचाच
काय तो आवाज
झाला...तेवढाच.
*****
प्रकाश केळकर
मस्तच ... फोटो टाक ब्लाॅग मध्ये... अजून मज्जा येईल...
ReplyDeleteसुंदर!
ReplyDeleteHmmm...निस्तब्ध झालेली आयुष्याची संध्याकाळ!!
ReplyDeleteआज आपण जात्यात आहोत सुपातल्या दिवसावर प्रकाश टाकलास .
ReplyDeleteसुंदर लेख म्हणवत नाही .
व्रुद्ध शब्द केविलवाणा वाटतो ,ज्येष्ठ शब्दात प्रतिष्ठा आहे.पण संबोधनाने परिस्थिति बदलत नाही .
थोडक्यात स्थळ बदलले तरी स्थिति तीच !!
Hmm that's life!!
ReplyDeleteईतकी वेळच नको यायला. कायम केलेल्या मेहेनतीचे चीज झालेले दिसावे हीच ईश्वरा चर्णी प्रार्थना. लेख मात्र डोळ्यासमोर चित्र ऊभ करतो.
ReplyDeleteToo good
ReplyDeleteToo good
ReplyDeleteThank you all for your comments on the post...
ReplyDeleteVery well penned!!
ReplyDelete