प्रतिबिंब ...
कोणताही चांगला काढलेला फोटो पहिला कि मनात काही विचार दाटून येतात... माझ्याही... त्या फोटोतल्या सौंदर्याबद्दल, त्या टिपलेल्या क्षणांनाबद्दल त्यातील भाव आणि फोटोपलीकडे जाऊन त्यामागे दडलेलं काही शोधण्याच्या प्रयत्नात हे विचार व्यक्त होतात... पाण्यात दिसणाऱ्या आपल्या भोवतीच्या परिसराच्या प्रतिबिंब सारखे.
माझी अशीच एक उत्तम फोग्राफर मैत्रीण भक्ती गोखले-वैद्य काही ना काही कुठे कुठे काढलेले फोटो पाठवत असते आणि मग ह्या विचारांना चालना मिळते... अश्याच काही पाठवलेल्या तिने काढलेल्या सुंदर छायाप्रकाशचित्रांवर वेळोवेळी प्रतिबिंबित झालेले माझे विचार आज इथे मांडतोय...
एक महत्वाचं ... जर काही ह्या विचारांमध्ये तुम्हाला छान सापडलं तर त्याच सारं श्रेय जातं फक्त ...आणि फक्त ...भक्तीच्या सुंदर छायाचित्रांना.
ॲलिसच्या नजरेतून... |
ॲलिस इन वंडरलॅंड मधे तीच्या नजरेतून दिसणारं फुलपाखरू जसं पडद्यावर दिसतं ना...तसंच काहीसं हे दृश्य... पाहाणारा होतो लहान आणि फूल व पाखरू दिसतं भव्य, भासमान,..!!! निसर्ग सगळा असाच आहे... आपणच फक्त त्याला उलट्या नजरेनं पाहातो...किंबहुना आपल्यातली ॲलिस हल्ली कुठेतरी हरवलीय... कायमची. विधात्याच्या ह्या सुंदर निर्मितीकडे लहान ॲलिस बनून पाहूया... त्याचं भव्य रूप कांकणभर जास्त लोभस वाटेल.
उनाड क्षण |
गुळगुळीत डांबरी सडकेने जाताना अचानक हे चौघे स्वछंदी ( खरंतर उनाड हा शब्द जास्त गोंडस आहे)... रस्त्याकडे पाठ करून बसलेले... तळहाताएव्हढ्या मोबाईल स्क्रीनच्या कक्षेबाहेर येवून समोरचं हिरवागार शिवार, आकाशातील निळाई आणि त्याकडे झेपावणारा देवळाचा कळस साक्षीला ठेवत त्याची निवांत खलबतं चालली असणार बहुतेक... उद्या कोठे उनाडायला जायचं त्याची. पाठमोरे असूनही त्यांच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद आपण पाहू शकतो ह्या फोटोत... आपापल्या चाकोरीच्या सडकेने पुढे जाताना.
कॉकटेल |
जगातल्या साऱ्या भावनांचा कल्लोळ हिच्या डोळ्यात आणि चेहेऱ्यावर एकदम जमा झालाय जणू... प्रेम, लटका राग, वात्सल्य, ममता, कौतुक, असूया, जिज्ञासा आशा निराशा सगळं सगळं एकत्र येऊन त्याच एक सुरेख कॉकटेल ह्या फोटोतल्या चेहऱ्यात बनवलय ... त्या क्षणी... कोणाच्या कडे पाहून, कोणाचा विचार डोक्यात घेऊन, कुठल्या घटनांचा, कोणत्या संदर्भांचा हि नक्की विचार करतीय ह्याचा थांग लागत नाहीये... खरोखर स्त्री हि अथांग आहे समजायला आणि समजून घ्यायला ... मग ती प्रेयसी , बायको , बहीण , मैत्रीण किंवा आई ... कोणी हि असो... हा संभ्रम कायमचा आहे ... आणि ह्या छायाचित्रातील स्त्री हे त्याच रूपक आहे.
स्फटिकसुंदर |
कोळीष्टकं, जळमटं वगैरे पाहीली की अडगळीच्या खोलीची किंवा घरातल्या न आवरलेल्या कोपर्याची किंवा भयपटातील एखाद्या पुरानी हवेली टाईप दृश्याची आठवण जागी होते...तशी बरेचदा आपण आपल्या डोक्यात ( आणि हृदयात) जळमटं घेवूनच वावरत असतो...पण ती आपल्याला दिसत नाहीत इतकंच...त्यातलं स्फटीकसुंदर रूप अचानक असं कधी नजरेस पडतं आणि कॅमेरात बंदिस्त होतं... त्याच्या वीणीतली नाजुक कौशल्यपुर्ण कलाकारी, त्याचे रेशीम सुंदर लकाकत्या धाग्यांचे गोफ, शेजारच्या प्रसन्न हिरवाईला बिलगून स्वतःचा श्वेत रंग उजळवलेली त्याची निटस बांधणी पाहिली, की वाटतं... ह्याला कोळिष्टक का म्हणावं? ... काही शब्द आपल्या मनांत एक विचित्र प्रतिमा निर्माण करून ठेवतात... ही पण जळमटं घालवायला हवीत... मग कळायला लागेल, दिसायला लागेल ... ह्या सृष्टीतलं हे असं लपलेलं सौदर्य... जे या छायाचित्रकाराला सापडलय... ह्या नितांतसुंदर कोळ्याच्या जाळ्यात.
देवबाप्पा |
लेखक: प्रकाश केळकर
सर्व छायाचित्रे: भक्ती गोखले -वैद्य
खूप छान... फोटो सुद्धा मस्तच...👍👌👌
ReplyDeleteमस्त रे , मित्रा
ReplyDeleteVery nice!...prose and photos!!
ReplyDeletenice one PK..
ReplyDelete"शब्दचित्र" रेखीव आहेत
सुंदर छायाचित्रे आणि तेवढीच उत्कट शब्दांची चौकट
ReplyDeleteMasst re !!!! Pictures pan Sunder !!!
ReplyDeleteप्रत्यक्षा हुन प्रतिमा उत्कट
ReplyDeleteप्रतिमें चे भावतरंग ही उत्कट
Excellent photos and narrative. The last one about small boy and 4 boys very apt.seeing through and beyond always gives immense pleasure.
ReplyDeleteVery nice!
ReplyDeletePhotos sundar aahet ani tuza likhan hi!! Masta ! Anita Joshi
ReplyDeleteवा प्रकाश! आता दर आठवड्याला तू काय लिहितो आहेस ह्याचे कुतुहल वाटू लागले आहे! 😊
ReplyDeleteफोटोतील भावना शब्दात... वाह...👌
ReplyDeleteफोटोतल्या भावना किती हळुवारपणे मांडल्या आहेस .. सेन्सिटिव्ह माणसालाच असे विचार करता येतात .. खूप छान
ReplyDeleteThank you all for your lovely comments and feedback...
ReplyDelete