पूर्णविरामांची रांगोळी...
पिंपळाचं पान किंवा गुलाबाचं सुकलेलं फुल जुन्या पुस्तकात अचानक सापडलं कि त्याच्या जाळीदार नक्षीत भिरभिरणारं  मन अडकून विसावतं,  सुकलेल्या पाकळ्यांमधला गंध शोधत राहतंपुस्तक मिटून ठेवल कि ते भानावर येतं,  पुन्हा परत कधीतरी जुन्या पानांमधले ते अपूर्णविराम अचानक दिसे पर्यंत...
हे असे अपूर्णविराम अधून मधून दिसत राहतातभेटत राहताततुम्हा आम्हा , सगळ्यांनाच...समजायला लागलेल्या वया पासून ते समजून घेण्याच वय होई पर्यंत आणि पार काही समाजायच्याही पलीकडे जायी पर्यंत.
डायरी लिहायला सुरुवात होतेबराच काळ लिहिली जातेमग मधेच कुठेतरी ती अपूर्णविरामाची वेळ येतेशेवटच्या लिहिलेल्या कवितेच्या खाली सही करायची पण राहून जातेत्या जागी दोन अश्रू मात्र विसावतात , पानामध्ये जिरून जातातपरतपुन्हा ते पान उलगडे पर्यंत....  त्या सुकलेल्या अश्रूंच्या सही मधला अपूर्णविराम मग दिसत राहतो पुढे कित्येक काळ... डायरी मात्र लिहायची राहून जाते कायमची.
शाळेच्या नाटकात मिळवलेली बक्षिसेशिकलेला तबलालिहिलेली कविता ... पुढे आपण हेच करायचंह्यातच नाव मिळवायचं आशा  विचारात गुरफटलेली ... ती गुरफटलेलीच  राहते आशाच एका आपूर्णविरामाला धरूनआपण पुढे जातो अधिक काही करायलाखर तर बरच काही आपल्यातल गमवायला.
पुढे थोडी जास्त अक्कल आल्यावर कुठल्या तरी चळवळीत भाग घेतोकाही उदात्त करायच्या ध्येयानं.पुढे जाऊन ह्यालाच वाहून घ्यायचं आशा खोट्या(तेंव्हा  वाटणाऱ्या)आशेनं . कधी तरी मग तो अपूर्णविरामाचा क्षण येतोध्येयाची लक्तरं उलगडून दाखवतो....आपण त्याच ऐकत, सत्यपरिस्थितीचा मागोवा घेत,  त्याला साक्षी ठेवत त्या चळवळीला आपण आपल्यापुरती मूठमाती देतो.पुढे तरारलेलं त्याच रोप आणि त्याचा झालेला  इतरांनी वाढवलेला महावृक्ष असूयेनं पाहण्यासाठी.
काही तरी वेगळ करायचं असतंआपल्यातल्या प्रत्येक मनाला तेच वाटत असतंपण त्या वेगळेपणाला आपल्या लेखी त्या वेळी अढळपण नसतंआपलेच आपण अपूर्णविराम तयार करत राहतोसतत....  ऐकलेल्या मानाचं सांत्वन करत आपण पुढे जात राहतो , हे सगळे अपूर्णविराम मागे ठेवत.
पण तसं काहीच कुठे कमी पडलेलं नसतंसुखाच्या बऱ्याच पायऱ्या पुढे दिसत असतात .मागच्या  बऱ्याच पायऱ्या आपण चढलेल्या असतात... थोड थांबावं अस वाटणाऱ्या एका पायरीवर आपण विसाव्याला टेकतोमागे वळून पाहतो आणि मग ...  दिसू लागतात , भेटू लागतात पुन्हा सारेसारे आपूर्णविराम.
मग त्या आपूर्णविरामाचा पाठलाग सुरु होतो...  संपणारापुन्हा डायरी जवळची होतेकवितांना उजाळा मिळतोनाटकांच्या तालमी जागवल्या जातात , तबल्यावरची धूळ झटकली जातेजुन्या मित्रांना साद जाते झेपलेल्या चळवळीला हलकासा पाठिंबा व्यक्त होतो... मित्र भेटतातशाळूसोबती भेटतात , एवढच काय जुन्या मैत्रिणी सुद्धा खळखळून हसत भेटतात.
आपूर्णविराम हळू हळू विरून जातात.    सांधलेल्या ह्या साऱ्या जिवलग ठिपक्यांची एक सुरेख नक्षी बनतेत्यात आधी भरायचे राहून गेलेले इंद्रधनुष्यी रंग  उतरून येतात आणि मग दिसायला लागते  ... अनेक बंधानी बांधलेली ...सुबक ,सुंदर ,आपलं भिरभिरणार मन स्थिर ठेवणारी ....  पूर्णविरामांची सुरेख रांगोळी !!!
*****
प्रकाश केळकर 

Comments

  1. तुझ्या लिहीणया चा वेग आणि आवेग,विषयाचा आवाका आणि नावीन्य सगळच छान ....त्याला एकही अर्धविराम नसुदे.👍
    मंजू

    ReplyDelete
  2. खुपच छान "प्रकाश"

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. या सगळ्या अपूर्ण विरामांना जोडण्यात सिंहाचा वाटा असतो मित्रांचा. प्रत्येक मित्रांसोबत आपलं एक चित्र स्तब्ध झालेल असतं. अनेक वर्षानंतर हेच चित्र आपल्याला खूप मागे घेवून जातं, आणि मनाला अलौकिक आनंद देतं .

    ReplyDelete
  5. Wah ! Kya baat hai!!
    Anita Joshi

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog