"जादूचं कपाट"  

चांदोबा, कुमार, किशोर, चंपक ,अमर चित्रकथा,.  पत्ते,क्यारम,सापशिडी, व्यापार लपंडाव, आबाधोबी, लंगडी,गोल खोखो आणि क्रिकेट  ह्या सगळ्या दिवाळी उन्हाळी सुट्टीमधील घरगुती आणि मैदानी करमणुकीच्या मित्रमंडळीनमध्ये अचानक एका वर्षी तो नवीन आयटम आमच्या रंगीबेरंगी दुनियेत प्रवेश करता झाल. संध्याकाळच्या परवचेच्या वेळेला चाट देवून आणि वाड्याच्या चौकातला  खेळ आवरता घेवून आम्ही त्याच्या समोर  रमु लागलो एका नवीन पर्वाला सुरुवात करत.

आजोबांच्या जानव्याला एक नवीन किल्लीची जोड मिळाली. त्या नवीन घरातील वस्तूला कुलुपात बंद करण्याची त्यांची आजून एक जबाबदारी वाढली. संध्याकाळचे वाजले कि असेल तो खेळ टाकून आम्ही पण दिवाणखान्यात जमू लागलो. संध्याकाळी ती विशिष्ठ धून कानावर पडली कि वाड्याच्या चौकात गोल खो खो किंवा डबा ऐसपैस खेळणारे सगळे धडाधड  जिने चढून दिवाणखान्यात हजर होऊ लगलो… 

वाड्यातली १० बाय १० ची १५/२० बिऱ्हाडेप्रत्येकाची किमान ह्या हिशोबाने दाटीवाटीने दिवाणखान्यात प्रचंड कलकलाटात " किलबिल" सुरु होण्याची वाट पाहत जमा झालेल आमची सेना पूजा करण्यापूर्वीच्या तयारी सारखीच मग सार TV चं आलबेल आहे ह्याची खात्री करणारे आजोबा  आणि रोजच्या ह्या गोंधळात स्वताशी बडबड करत, चार आजोबाना, चार आम्हाला , आणि इतर उरलेल्या  दूरदर्शन निर्माण करणार्यांना वाहून,आमच्यात येउन बसणारी आजी.मग जानव्याच्या किल्लीने ते सरकत्या दरवाज्याचे निघालेले कुलूप बाजूला होणारं मुद्दाम कव्हर म्हणून विणलेल क्रोशाच कापड  … स्विच ऑन केल्या वर आलेला बारीक कुईई आवाज आणि मग आधी मुंग्या मुंग्या आणि पाठोपाठ फिरणाऱ्या दोन कुयऱ्या दाखवणारा चकचकीत पडदा . आणि ती शांत धीर गंभीर धून . ताsss   ना नाsss तनानाsss   नाss अहाहा कोणत्याही संध्याकाळी दिसणारे ते जादुई दृश्य  मला आजूनही दिसत तेंव्हा मनात आताही टाळ्या वाजतात खोल कुठे तरी कायमच्या रेकौर्ड झाल्यासारख्या. 

बुकिंग करून महिन्या दोन महिन्यांनी मिळणारा त्यावेळचा TV हळू हळू इतिहासात जमा झाला आणि घरोघरी येउन विराजमान झाला घरोघरी कशाला, काही घरी प्रत्येक खोलीत पण आता विसावला तो आता मोबाईल मध्ये पण दिसू लागला. 
वाडे पडले, वाडा संस्कृती उपसलेल्या माती विटा बरोबर दूर कुठे तरी गेली, आणि दुसर्याच्या घरी बसून एकत्र कार्यक्रम पहायची गम्मतहि आता गंमतशीर वाटू लाली. आमची माती आमची माणसं, किलबिल, ज्ञानदीप , सुंदर माझ घर, साप्ताहिकी , छायागीत , फुल खिले है गुलशन गुलशन,  झोपी गेलेला जागा झाला, चारली चाप्लीन , जाड्या रड्या , टेली  म्याचेस बघत बघत आणि  त्या स्वप्नातून जागे होत होत आम्ही कधी मोठे झालो आणि    एका लग्नाच्या , सासू सुनाच्या आणि उंच उडणाऱ्या झोक्याबरोबर घडणाऱ्या डेली सोपच्या ३० मिनिटांच्या घटनां मध्ये कधी येवून पोचलो आमच आम्हालाच समजलच नाही

पण एक मात्र खर, त्यावेळी संध्याकाळी दूरदर्शन ची वेळ सुरु होण्यापूर्वी स्वैपाक उरकून घेणारी गृहस्वामिनी हल्ली पण सिरियल च्या वेळात दोन पोळ्यांच्या मध्ये तवा बंद करून TV  समोर बसतें बातम्या मोठ्याने लावून बघणारे आणि त्यासाठी ओरडून घेणारे घरातले नवरे आजूनही नको तेंव्हा news चानेल लावून ओरडा खातात. आणि तेंव्हा गृहपाठ केल्या शिवाय TV बघितल्यावर मिळणारा धपाटा आजूनही हल्ली च्या मुलांना त्यांच्या खोलीत डोकावून पाहणाऱ्या आई कडून नको तो कार्यक्रम बघताना पकडल्यावर बसतो… 

कोणी  दूरदर्शन  म्ह्णा , कोणी डिश TV  म्हाणा , कोणी त्याला इडीयट बॉक्स म्हणा  , शुभ्र धवल पासून ते सारे सप्तरंग लाभलेल्या  कुंचल्यासोबत आपल्या सर्वांच्या क्यान्व्हासवर रंगांची मुक्त उधळण करत घरात कायमच बनून राहिलेलं हे आहे एक  " जादूच कपाट".

*****


प्रकाश केळकर 

Comments

  1. Ase chaan lihilele asel tar TV chi garajach naahi ! Waachta wachta sagla chitra domyasamor yeta 😊

    ReplyDelete
  2. अणु पासोन ब्रह्मांण्डा एवढा होत जातसे
    तयासी तुळना कैसी ...एक मारुति आणि दूसरा Tv

    ReplyDelete
  3. Aha! Tya weli ji maja yaychi ti aajchya bharamsath program na nahi. Again nostalgia .. TVchya excellent program madhla... Well said Prakash. Anita Joshi

    ReplyDelete
  4. खूप मस्त मित्रा

    ReplyDelete
  5. Beautifully carfted that era.. Likhan apratim! - Tejaswini

    ReplyDelete
  6. The changes in that TV BOX and the changes in relations and changes of childhood memories , very well captured Prakash , ti doordarshan chi tune parat aikavishi vaatli

    ReplyDelete
    Replies
    1. Very nostalgic!! I remembered similar experience when Kiran More (Indian wicket keeper) who was our neighbor first time played ODI with England on 5th December 1984 his whole family and around 150 or more people viewed the match in our diwankhana on our westen shutter TV. It is the reminder of that Refreshing cheerful exclamation.

      Delete
  7. thank you all... aasech vachat raha... mi pan lihit rahin...

    ReplyDelete
  8. सुंदर लिहिले आहेस प्रकाश!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog