Posts

Showing posts from 2019
अरे sss कुठे नेवून ठेवलाय माझा ...  गेले काही आठवडे धमाल चालू आहे... बोरिवलीच्या उद्यानाच्या हद्दीबाहेरील एका  भल्या मोठ्या जंगलात नुसता धुमाकूळ चालू आहे.  टीव्ही लावला की तो चोवीस तास पाहायला मिळतोय . माकडांच्या कोलांट्याउड्या, वाघाचे खेळ आणि इतर बऱ्याच जणांचं बरंच काही पाहून हसता हसता डोळ्यात पाणी येतंय... सांगता येत नाही आणि सहनही होत नाही इतकी करमणूक ... पण म्हणून मोजक्या शब्दात मांडायचा हा एक प्रयत्न ...  घड्याळाच्या   तबकडीवर   होता   फिरत   एकच   फक्त   हात ,  अन्   वाघाच्या   जबड्यात   होते   दिसत   दुधाचेच   दात ... भगव्याला   लावून   पाहीली   त्यांनी   हिरवी   एक   झालर ,  उजवी   कडून   चालणारे   मग   बोलत   राही ले   सेक्यूलर ... पन्नास   पन्नासची   बेरीज   त्यांची   कधीच   जमली   नव्हती , तिन   आकड्यांच्या   भागाकारातून...
आठवणीतला  उष : काल...  प्रत्येक सकाळ वेगळी असते, प्रसंगानुरूप आणि हरेक ठिकाणाची. आपापल्या परीने कमीजास्त सुंदर, छान, प्रसन्न,शांत, कधी जागरणाने  आळसावलेली तर  कधी मलमली तारुण्य वगैरे  पांघरलेली.. . वेगवेगळ्या रूपांची ...लहानपणी सुट्टीत प्रवासाला जाताना उत्साहाने भरलेली एका हाकेत उठवणारी, बरेचदा अभ्यासासाठी जीवावर येऊन डोळे चोळत उठायला लागणारी, पुढे मग नोकरीसाठी वेळेच्या बंधनात बांधून उठवणारी तर कधी रंगलेली महेफील जागवल्यावर हुरहूर लागून उठायला लावणारी....   इतर वेळी सकाळी  आळसावल्या सारखं होतं, पण दिवाळीच्या पहाटे मात्र एक वेगळाच नूर असतो... आज दिवाळी आहे ह्या विचारताच एक प्रसन्नता घेऊन ती सकाळ उगवते. मग ते ठिकाण जगाच्या कोपऱ्यात कुठे का असेना.... पण काहीवेळा  प्रातःकालाची नाळ मात्र स्थळ आणि वास्तूशी अगदी घट्ट जोडलेली असते. ह्या आठवणी  मग कधीतरी खुणावतात... लहानपणी सुट्टीत अनुभवलेले ते प्रसन्न क्षण दरवाळतात... अश्याच एका प्रातःकाळी मला काही ओळी सु...
गोष्ट आनंदाची    नुकतच वाचनात आलं...  कोणा शास्त्रज्ञांनी म्हणे एक प्रयोग केला होता. पिंजऱ्यातल्या उंदराला एकीकडे चीज आणि दुसऱ्याबाजूस एक प्याडलरुपी बटण ठेवलं. उंदराच्या मेंदूत वायरने काही इलेट्रोड्स सेन्सर्स जोडले, प्याडल दाबलं कि मेंदूमध्ये कृत्रिम आनंदी संवेदना निर्माण करणारे. पिंजऱ्यातल्या त्या  उंदरांने एकदा प्याडल दाबलं आणि मग पुनःपुन्हा दाबतंच राहिला. ती आनंदी संवेदना त्याला सुखावत आसणार. चीजकडे तो फिरकलाच नाही. वास्तविक चीजच्या चाव्यातून तीच आनंदी संवेदना त्याला मिळत असावी. पण प्याडलच्या दाबण्याने आपोआप मेंदूत  मिळणाऱ्या आनंदात तो सुखावत गेला आणि शेवटी उपासमार होऊन मरून गेला.  कशाच्या तरी मागे आपणहि असेच पळत असतो. काहीतरी कृत्रिम आनंद देणाऱ्या आशाच एखाद्या बटणावर आपला पाय कधीतरी नकळत पडतो आणि त्याचाच हव्यास जडतो. खऱ्या आनंदाच्या गोष्टी मागे पडतात आणि मग व्हायचा तोच परिणाम होतो. रॅटरेस ह्यालाच म्हणतात का? असेलही. पिंजऱ्यातल्या उंदरात आणि ह्या शर्यतीतील प्राण्यांमध्ये फारसा फरक नाहीये म्हणा.  आपल्याला...
-भय, अटळता आणि अस्तित्व- एका साहित्यप्रेमी मित्राने व्हाट्सअपवर खलील जिब्रानचं एक विचारकाव्य पाठवलं ... म्हणाला "वाच आणि पहा केवढं तत्वज्ञान सांगून गेलाय"  ... खरंच! त्या साध्या सोप्या भाषेत केवढा मोठा विचार मांडलाय जिब्रानने. एक नदी समुद्राला मिळताना तिच्या मनातल्या भीतीचं रूपक देऊन सांगितलेलं जीवनाचं सार ... पुढे दिसणाऱ्या विशाल समुद्राला पाहून दडपून गेलेल्या नदीला वाटणारी भीती, तिच्या लक्षात आलेला जीवनाचा अर्थ,त्यातील अटळता आणि त्यातून साकारलेली सकारात्मक भव्यता मन उजळून गेली... ह्या विचाराला व्यक्त करण्याचं आणि जिब्रानच्या त्या मुक्तछंदातील काव्याचं आपल्या कुवतीत स्वैर रूपांतर करावंसं वाटलं... त्याच्या एवढी खोली गाठणे शक्यच नाही... पण मी एक प्रयत्न केला तो इथे मांडतोय...  आधी खलील जिब्रानचा मूळ विचार आणि नंतर माझा काव्यपंक्तीप्रपंच.  -FEAR- Khalil Gibran It is said that before entering the sea a river trembles with fear. She looks back at the path she traveled,from the peaks of the mountains,  the long winding road,cross...
पिट स्टॉप ... तशी ७५ मैल वेगाने धावणाऱ्या शिस्तबद्ध शहाण्या गाड्यांच्या एकसंध रांगेतून थोड बाजूला होत गाडीने अलगद उजवीकडे सुबक वळण घेतलं आणि गॅस स्टेशन रेस्ट एरियाच्या भल्याथोरल्या जागेत कोपऱ्यातल्या मॅकडोनाल्ड जवळ येऊन थांबलो... २ तास गाडी चालवून आलेला शीण घालवत दुमडलेल्या पायांना मोकळ कराव आणि जमलंच तर एखादा हलकासा सँडविच आणि बरोबर थंडगार कोक रिचवावा, ह्या इराद्याने.... इथल्या हमरस्त्याकडेच्या अश्या जागी असते तितपतच आजूबाजूला तुरळक गर्दी...  एक भल्याथोरल्या अंगापिंडाचा, डोक्याखाली माझ्या मांडी एवढी गर्दन राखलेला आणि तेवढ्याच अवाढव्य गाडीतून उतरलेला लाल गोरा देह, एका छोट्या गाडी मधून पायउतार झालेल चिनी कुटुंब  आणि दूरवर कोपऱ्यात उभे राहून टवाळक्या करणारं चार कृष्णवर्णी पोरांचं टोळकं ...बस! एवढीच माणसं. पेट्रोल भरायला पण आपला हात जगन्नाथ त्यामुळे तिथंही कोणी नाही. तरी टळटळीत दुपारी ३ ची वेळ. एरवी रात्री इथे किती राबता असेल देवच जाणे. आमच्याकडे  पेट्रोल स्टेशन आणि हायवेकडेच खाण्याचं ठिकाण म्हटलं की रस्त्यावर वर्दळ असते तेवढीच तिथंही गर्दी ... बारामहिने चोवीस तास... ( ...
उत्क्रांती...    डार्विन च्या थेअरी नुसार माकडाचा हळूहळू माणूस झाला आणि हा मनुष्यजातीचा प्रवास अविरत चालू राहिला. त्याला स्वतःची ओळख पटू लागली. शक्ती युक्ती बुद्धी प्राप्त झाली आणि हळू हळू प्रगत होऊ लागली. त्याला आता गरज भासायला लागली, स्वतःची पटलेली ओळख दुसऱ्याला सांगायची आणि पटवून द्यायची.  कर्तृत्व अकर्तृत्व, यश अपयश, भाषा, जात पात, धर्म, देश, व्यवसाय, नातेसंबंध, आपलं परकं, आणि शेवटी शत्रू व  मित्र ह्यातून ही ओळख तो देता झाला आणि स्वतःची अशी ओळख निर्माण करता झाला. पण ह्या पलीकडे जाऊन अजून एक बदल हळू हळू घडू लागला. दुसऱ्याला त्याची ओळख करून घेणं आणि ती ओळख पटवून घेणं जरूरी होऊ लागलं... मी तो मीच आणि कोणी तोतया नाही हे सांगण्यासाठी काही भक्कम पुरावा आपल्या जवळ असावा हे माणसाला वाटू लागलं ... आणि इथेच ओळख पटवून देण्याच्या साधनांचा शोध झाला असावा.  स्वतःची ओळख पटवून द्यायला राजपत्र, मुद्रा, विशेष पोशाख, आभूषणं , अलंकार, आणि शब्द निर्माण झाले... ठराविक ठिकाणी प्रवेश मिळण्यासाठी परवलीचे शब्द तयार झाले. प्रवेशद्वारावरील पहारेकर्याच्या शि...
मतदानाचा दिवस सकाळपासून खुरमांडी घालून बसलेल्या तात्याबानं दुमडलेला पाय सरळ केला , पायाला   आलेल्या मुंग्याना वाट करून द्यायला एका हातानं पाउलाचा अंगठा दुमडला , खुब्याच्या   हाडांमधे उठलेली एक बारीक पण सणसणीत   कळ पचवली    आणि    कानावरून अर्धी विझवून ठेवलेली विडी काढली .   बसकनाच्या खाली   ठेवलेली   माचीस शोधायला हात घातला पण ती मिळेना ...  " इच्यामारी ! नेली वाटतं ... म्हाताऱ्याला माचीस पण ठिवत नाहीत का काय   आता ." ... माचीस लंपास केलेल्या आपल्या मुलाच्या   नावानं उद्धार करून तो कोनाड्यात ठेवलेली दुसरी माचीस शोधायला सरपटत भिंतीलगत सरकला . दोन चार फूट सरकतानापण होणारा   त्रास कपाळावर त्याच्या चार जादा उमटलेल्या आठ्यांमधून दिसत होता . धूर काढायची तल्लफ आलेल्या तात्याबान तो त्रास तसाच गिळला आणि कोनाड्यात वर हात घालून कशीबशी माचीस मिळवली ... तिथंच भिंतीला टेकून त्यानं बिडी शिलगावली आणि एक दमदार झुरका छातीत ...