Posts

Showing posts from November, 2018
झेंडा रोविला ... किल्कनि , आयर्लंड मधल्या त्या छोट्याश्या गावातली मध्यरात्र उलटून गेली होती. सगळी कडे सामसूम आणि थंड शांतता. मधूनच एखाद्या बंद होत आलेल्या पब मधील वाद्यांच्या सुरावटी थंडी बरोबर उडत उडत येत होत्या. रस्त्यावरची शांतता माझ्यासाठी आलेल्या टॅक्सीने भेदली. हम रस्त्यावर पोचलो तो पर्यंत १ वाजला असणार. १० मिनिटात डब्लिन कडे जाणारी बस येथे येईल अस सांगून टॅक्सीवाल्याने मला रस्त्यावरच्या थांब्यावर सोडल. ब्याग ओढत मी फुटपाथ वर विसावलो आणि कोपर्यात आजून एक प्रवासी थांबलेला दिसला… का कोण जाणे…  तो मराठी असणार आशी मजेशीर कल्पना मला  चाटून गेली आणि माझ्या तोंडून नकळत " नमस्कार" उच्चारला गेला...एका क्षणात परतीचा “ नमस्कार” शब्द त्या शांत वातावरणात कानावर आला... त्यानंतरचा डब्लिन पर्यंतचा प्रवास अवर्णनीय होता… डॉ. कुलकर्णी  २० वर्षे किल्कनि मध्ये डॉक्टरकी करतोय… पुण्याला आई वडिलांना भेटायला निघाला होता… आश्या आडगावात आणि आडवेळी मला भेटला आणि तोही एक अस्सल मराठी माणूस!!!… मौज च्या एका दिवाळी अंकात वाचलेला लेख आठवतो… अन्नपूर्णा तर्खडकर, १९ व्या शतकात विलायतेला शिकायला गेलेल...
पाडव्याचा गोडवा ...  जेवताना अचानक पानात गरम गरम पोळी आणि त्यावर साजूक तुपाची धार पाहून एकदम कावराबावरा झालो... तर शेजारी हि उभी, प्रसन्न हास्य घेऊन .. माझ्या गोंधळून गेलेल्या चेहेऱ्यावरचा घामाचा थेंब हळूच पदराने टिपत तिने अजून एक झक्कास स्माईल दिलं... आणि माझ्या डोक्यात एकदम लख्ख उजेड पडला... अरे हो!!! उद्या पाडवा नाहीका !!! आपल्या सणांमध्ये काही प्रथा आहेत.  त्या का आणि कशा पडल्या आणि केंव्हा रुजल्या कोणास ठाऊक...उदाहरणार्थ,  दसऱ्याला गाडी का धुवायची ?, दिवाळीत किल्ला का करायचा? ह्या आणि आश्या अनेक प्रश्नांपैकी पडलेला अजून एक प्रश्न ' पाडव्याला बायकोला किमती वस्तू भेट का द्यायची? आणि तोही दागिनाच, असं का?' ... हा प्रश्न मी एकदा ऐरणी वर आणून पहिलाय, घरात जेवणाच्या टेबल वर चर्चा रंगली होती तेंव्हा.. त्याच उत्तर मला दोन दिवसापूर्वीचा भात आणि त्यावर कोमट झालेली आमटी पानात पडून मिळालं होत. ( ती जागा असे प्रश्न चर्चेला आणण्याची नाही अशी त्यानंतर कायमची खूणगाठ मी बांधली... त्याचा अजून फायदा होतोय).  सकाळी उटण्...
एक दिन... रहदारीतला. स्थळ: मेन रोड, ट्राफिक सिग्नल ; वेळ: सकाळची,घाईची. सिग्नल लाल होता... हो! नक्की लाल होता... पण, मला रंगांधळेपण आलय कि काय अशी शंका येईल इतकी आजूबाजूने रहदारी पुढे जात होती. स्कुटर, गाड्या, रिक्षा...एक छोटा टेम्पो पण सिग्नल पार करून पुढे गेला... मी थांबलो होतो मात्र! हो, लालच होता सिग्नल. नक्की!...  मी माझ्या शर्टचा रंग पाहून परत एकदा खात्री केली. मला शर्ट निळा दिसला. कालच घेतलाय नवीन, रंग विसरायचा प्रश्नच नाही... पण तरी एक शंका चाटून गेली. मला कदाचित लांबच रंगांधळेपण आलं असावं... लांबचा चष्मा लागतो ना! तसं... मला तरी अजून सिग्नल लाल दिसत होता!... दोन हात पलीकडे अजून एक माझ्या सारखाच उभा. मोटारसायकल वर बसून हेल्मेट मधून सिग्नल कडे पाहणारा...बहुतेक त्याला पण सिग्नल लाल दिसत असणार!!!  त्यानी मला पाहिलं आणि मुंडी हलवली,  हेल्मेटच वायझर वर केलं आणि माझ्याकडे पाहात हसून म्हणाला... " मी एरवी अमेरिकेत असतो. सुट्टीवर आलोय... तुम्ही कोणत्या परदेशात राहता?" ...  दोघे मनमुराद हसलो... तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला. निदान आम्हा दोघा रंगआंधळ्यांना त...