"मैत्र जीवांचे" मे महिन्यातील शुक्रवार दुपार. खरंतर लांबलचक उन्हाळा सुरु होण्यापुर्वीच्या सुखद हवामान काळातला तो शेवटचा महिना. पण ती दुपार मात्र फार रखरखीत जाणवत होती. कदाचित घराबाहेर न पडता बाहेर चालू असलेल्या परिस्थितीतुन सतत मनात साचलेल्या होरपळीमुळे असेल... कोविड ज्वालामुखीच्या उद्रेकाची झळ दिवसरात्र,चोवीस तास अन् तिन्ही त्रिकाळ शरीर, मन आणि मानसिकतेला विळखा घालून बसलेली. घरातल्या सुरक्षिततेच्या कोषात गुरफटून घेतलं असलं तरी फोन, झूम, नेट,टीव्ही,व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टा, ट्विटर, ई-मेल आणि असंख्य ऑनलाईन मिटिंग मधून बाहेरच्या जगाकडेच सारे कान आणि डोळे लागून राहिलेले... ह्या अश्या डोक्यात अविरत माहिती ओतणाऱ्या सगळ्या माध्यमांपासून थोडा वेळ लांब राहायला फोन बाजूला ठेवून मी डोळे मिटून कोचावर पहुडलो... तेवढ्यात तो वाजलाच. स्क्रिनवरचं नाव पाहताच तात्काळ उचलला ... " नमस्कार. सॉरी शुक्रवारी दुपारी डिस्टर्ब करतोय. पण कामच तसं महत्वाचं आणि अर्जंट आहे... " पलीकडून संदीप, महाराष्ट्र मंडळ दुबई चे अध्यक्ष ... " आरे बोल ना! नो प्रॉब्लेम. मंडळाच्या कामासाठी तुला माहि...
Posts
Showing posts from 2020
- Get link
- X
- Other Apps
" परसंतोषे कष्टविली काया ..." चार्टर्ड विमानांच्या सफल योजनेची कहाणी " नमस्कार , मी राहुल तुळपुळे बोलतोय . तुमची फेसबुकवरची पोस्ट पहिली , काहीतरी करावंसं वाटलं म्हणून लगेच फोन केला . काय करू शकतो आपण ह्यासाठी एकत्र ? "... पलीकडून धनश्री वाघ बोलत राहिल्या आणि मी ऐकत राहिलो . किती वेळ कोण जाणे . बोलताना त्यांचा दाटून येणार कंठ आणि फोनवर न दिसणारे पण जाणवलेले त्यांचे डबडबलेले डोळे मला बरंच काही सांगून गेले आणि मी मनोमन हादरून गेलो ... कोविड नावाच्या अचानक कोसळल्या संकटाला सुरुवात होऊन दोन महिने उलटले होते . त्याचे उलटसुलट पडसाद रोज सकाळ दुपार संध्याकाळ आणि अहोरात्र कानावर आणि डोळ्यावर पडत होतेच . पण त्याचा हा अवतार मला नवीन होता . धनश्री बोलत राहिल्या आणि मी ऐकत राहिलो ... इथे ह्या परिस्थितीत अडकलेल्या अनेकांच्या कहाण्या ... सहज भेट द्यायला ...