अरे sss कुठे नेवून ठेवलाय माझा ... गेले काही आठवडे धमाल चालू आहे... बोरिवलीच्या उद्यानाच्या हद्दीबाहेरील एका भल्या मोठ्या जंगलात नुसता धुमाकूळ चालू आहे. टीव्ही लावला की तो चोवीस तास पाहायला मिळतोय . माकडांच्या कोलांट्याउड्या, वाघाचे खेळ आणि इतर बऱ्याच जणांचं बरंच काही पाहून हसता हसता डोळ्यात पाणी येतंय... सांगता येत नाही आणि सहनही होत नाही इतकी करमणूक ... पण म्हणून मोजक्या शब्दात मांडायचा हा एक प्रयत्न ... घड्याळाच्या तबकडीवर होता फिरत एकच फक्त हात , अन् वाघाच्या जबड्यात होते दिसत दुधाचेच दात ... भगव्याला लावून पाहीली त्यांनी हिरवी एक झालर , उजवी कडून चालणारे मग बोलत राही ले सेक्यूलर ... पन्नास पन्नासची बेरीज त्यांची कधीच जमली नव्हती , तिन आकड्यांच्या भागाकारातून...
Posts
Showing posts from November, 2019
- Get link
- X
- Other Apps
आठवणीतला उष : काल... प्रत्येक सकाळ वेगळी असते, प्रसंगानुरूप आणि हरेक ठिकाणाची. आपापल्या परीने कमीजास्त सुंदर, छान, प्रसन्न,शांत, कधी जागरणाने आळसावलेली तर कधी मलमली तारुण्य वगैरे पांघरलेली.. . वेगवेगळ्या रूपांची ...लहानपणी सुट्टीत प्रवासाला जाताना उत्साहाने भरलेली एका हाकेत उठवणारी, बरेचदा अभ्यासासाठी जीवावर येऊन डोळे चोळत उठायला लागणारी, पुढे मग नोकरीसाठी वेळेच्या बंधनात बांधून उठवणारी तर कधी रंगलेली महेफील जागवल्यावर हुरहूर लागून उठायला लावणारी.... इतर वेळी सकाळी आळसावल्या सारखं होतं, पण दिवाळीच्या पहाटे मात्र एक वेगळाच नूर असतो... आज दिवाळी आहे ह्या विचारताच एक प्रसन्नता घेऊन ती सकाळ उगवते. मग ते ठिकाण जगाच्या कोपऱ्यात कुठे का असेना.... पण काहीवेळा प्रातःकालाची नाळ मात्र स्थळ आणि वास्तूशी अगदी घट्ट जोडलेली असते. ह्या आठवणी मग कधीतरी खुणावतात... लहानपणी सुट्टीत अनुभवलेले ते प्रसन्न क्षण दरवाळतात... अश्याच एका प्रातःकाळी मला काही ओळी सु...