"मैत्र जीवांचे" मे महिन्यातील शुक्रवार दुपार. खरंतर लांबलचक उन्हाळा सुरु होण्यापुर्वीच्या सुखद हवामान काळातला तो शेवटचा महिना. पण ती दुपार मात्र फार रखरखीत जाणवत होती. कदाचित घराबाहेर न पडता बाहेर चालू असलेल्या परिस्थितीतुन सतत मनात साचलेल्या होरपळीमुळे असेल... कोविड ज्वालामुखीच्या उद्रेकाची झळ दिवसरात्र,चोवीस तास अन् तिन्ही त्रिकाळ शरीर, मन आणि मानसिकतेला विळखा घालून बसलेली. घरातल्या सुरक्षिततेच्या कोषात गुरफटून घेतलं असलं तरी फोन, झूम, नेट,टीव्ही,व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टा, ट्विटर, ई-मेल आणि असंख्य ऑनलाईन मिटिंग मधून बाहेरच्या जगाकडेच सारे कान आणि डोळे लागून राहिलेले... ह्या अश्या डोक्यात अविरत माहिती ओतणाऱ्या सगळ्या माध्यमांपासून थोडा वेळ लांब राहायला फोन बाजूला ठेवून मी डोळे मिटून कोचावर पहुडलो... तेवढ्यात तो वाजलाच. स्क्रिनवरचं नाव पाहताच तात्काळ उचलला ... " नमस्कार. सॉरी शुक्रवारी दुपारी डिस्टर्ब करतोय. पण कामच तसं महत्वाचं आणि अर्जंट आहे... " पलीकडून संदीप, महाराष्ट्र मंडळ दुबई चे अध्यक्ष ... " आरे बोल ना! नो प्रॉब्लेम. मंडळाच्या कामासाठी तुला माहि...
Posts
Showing posts from October, 2020