-भय, अटळता आणि अस्तित्व- एका साहित्यप्रेमी मित्राने व्हाट्सअपवर खलील जिब्रानचं एक विचारकाव्य पाठवलं ... म्हणाला "वाच आणि पहा केवढं तत्वज्ञान सांगून गेलाय" ... खरंच! त्या साध्या सोप्या भाषेत केवढा मोठा विचार मांडलाय जिब्रानने. एक नदी समुद्राला मिळताना तिच्या मनातल्या भीतीचं रूपक देऊन सांगितलेलं जीवनाचं सार ... पुढे दिसणाऱ्या विशाल समुद्राला पाहून दडपून गेलेल्या नदीला वाटणारी भीती, तिच्या लक्षात आलेला जीवनाचा अर्थ,त्यातील अटळता आणि त्यातून साकारलेली सकारात्मक भव्यता मन उजळून गेली... ह्या विचाराला व्यक्त करण्याचं आणि जिब्रानच्या त्या मुक्तछंदातील काव्याचं आपल्या कुवतीत स्वैर रूपांतर करावंसं वाटलं... त्याच्या एवढी खोली गाठणे शक्यच नाही... पण मी एक प्रयत्न केला तो इथे मांडतोय... आधी खलील जिब्रानचा मूळ विचार आणि नंतर माझा काव्यपंक्तीप्रपंच. -FEAR- Khalil Gibran It is said that before entering the sea a river trembles with fear. She looks back at the path she traveled,from the peaks of the mountains, the long winding road,cross...
Posts
Showing posts from September, 2019