बनमस्का ....
बनमस्का .... मी जे लिहीतो त्यात नेहमी भूतका ळ डोकावतो ...हो!!! नॉस्टॅल्जियात रमतो मी !!! आठवणींच्या दुनियेत हरवायला मला आवडतं ... आणि लिहायला मला ते व र्तमानात . थोड्या काळासाठी का होईना वास्तवापासून दूर जाण्याच आणि इतरांना तिथं नेण्याचं आणखी एक उत्तम साधन. माझ्या लिहीण्यात मग अंगण पसरतं , चांदण दिसायला लागतं , बकुळीचा सुंगधी सडा पडतो , बालपण डोकावतं, शाळा आठवते, कॉलेज कट्ट्याच्या आणि त्या स्वछंदी दिवसांच्या हलक्या फुलक्या आठवणी शेवरीच्या पांढऱ्या म्हातार्यांगत भिरभिरत राहतात. कट्टा !!!... कट्टा तर नॉस्टॅल्जिया च्या सफरीतलं माझ अत्यंत जिव्हाळ्याच ठिकाण... उरापाशी जपून ठेवलेल... किंबहुना तिथे कायमच गोंदलेलं एक सुंदर स्वप्नचित्र... अजूनही आजूबाजूला कोणी शिलगावलेल्या सिगारेटच्या वासानं माझ्या कट्ट्यावरच्या आठवणींचा वणवा पेटतो आणि चहाच्या एका कपा ...