Posts

Showing posts from May, 2020
लॉकडाऊन मध्ये ...  विश्वाच्या ह्या खेळात,  निसर्गाने टाईमप्लीज म्हटलंय. फक्त फरक एव्हढाच की,  मानवाच्या पालथ्या मुठीवर थुंकी लावून तो खेळ सोडून गेला...  आणि... आपण बसलोय बोंबलत,  तो कधी परत येईल ह्याची वाट पाहात...!! गेले काही आठवडे एक वेगळाच प्रवास चालू आहे आपल्या सगळ्यांचा... पण ह्यातूनही खूप काही चांगलं अनुभवायला मिळतंय...  ह्या दिवसात बरंच काही सुचलं, लिहिलं आणि अर्थातच सध्याच्या परिस्थितीला  अनुसरून... सादर करतोय... काही सकारात्मक. - १ -  माणसं   भेटतायत थोडीशी   का   होईना,   मास्क   लावून   असेना, बोलतायत   येतां   जाता   ... मनापासून   चेहेरे   दिसतायत अस्पष्ट   असले   जरी, धुसर   वाटले   तरी, मुखवट्यावीना   पाहता   ...  दूरवरून   भावना   पोचतायत दोन   हात   दूर   जरी, हात   हाती   नाही   तरी, डोळ्यामधे   भाव   दिसता...