Posts

Showing posts from July, 2019
पिट स्टॉप ... तशी ७५ मैल वेगाने धावणाऱ्या शिस्तबद्ध शहाण्या गाड्यांच्या एकसंध रांगेतून थोड बाजूला होत गाडीने अलगद उजवीकडे सुबक वळण घेतलं आणि गॅस स्टेशन रेस्ट एरियाच्या भल्याथोरल्या जागेत कोपऱ्यातल्या मॅकडोनाल्ड जवळ येऊन थांबलो... २ तास गाडी चालवून आलेला शीण घालवत दुमडलेल्या पायांना मोकळ कराव आणि जमलंच तर एखादा हलकासा सँडविच आणि बरोबर थंडगार कोक रिचवावा, ह्या इराद्याने.... इथल्या हमरस्त्याकडेच्या अश्या जागी असते तितपतच आजूबाजूला तुरळक गर्दी...  एक भल्याथोरल्या अंगापिंडाचा, डोक्याखाली माझ्या मांडी एवढी गर्दन राखलेला आणि तेवढ्याच अवाढव्य गाडीतून उतरलेला लाल गोरा देह, एका छोट्या गाडी मधून पायउतार झालेल चिनी कुटुंब  आणि दूरवर कोपऱ्यात उभे राहून टवाळक्या करणारं चार कृष्णवर्णी पोरांचं टोळकं ...बस! एवढीच माणसं. पेट्रोल भरायला पण आपला हात जगन्नाथ त्यामुळे तिथंही कोणी नाही. तरी टळटळीत दुपारी ३ ची वेळ. एरवी रात्री इथे किती राबता असेल देवच जाणे. आमच्याकडे  पेट्रोल स्टेशन आणि हायवेकडेच खाण्याचं ठिकाण म्हटलं की रस्त्यावर वर्दळ असते तेवढीच तिथंही गर्दी ... बारामहिने चोवीस तास... ( ...