उत्क्रांती... डार्विन च्या थेअरी नुसार माकडाचा हळूहळू माणूस झाला आणि हा मनुष्यजातीचा प्रवास अविरत चालू राहिला. त्याला स्वतःची ओळख पटू लागली. शक्ती युक्ती बुद्धी प्राप्त झाली आणि हळू हळू प्रगत होऊ लागली. त्याला आता गरज भासायला लागली, स्वतःची पटलेली ओळख दुसऱ्याला सांगायची आणि पटवून द्यायची. कर्तृत्व अकर्तृत्व, यश अपयश, भाषा, जात पात, धर्म, देश, व्यवसाय, नातेसंबंध, आपलं परकं, आणि शेवटी शत्रू व मित्र ह्यातून ही ओळख तो देता झाला आणि स्वतःची अशी ओळख निर्माण करता झाला. पण ह्या पलीकडे जाऊन अजून एक बदल हळू हळू घडू लागला. दुसऱ्याला त्याची ओळख करून घेणं आणि ती ओळख पटवून घेणं जरूरी होऊ लागलं... मी तो मीच आणि कोणी तोतया नाही हे सांगण्यासाठी काही भक्कम पुरावा आपल्या जवळ असावा हे माणसाला वाटू लागलं ... आणि इथेच ओळख पटवून देण्याच्या साधनांचा शोध झाला असावा. स्वतःची ओळख पटवून द्यायला राजपत्र, मुद्रा, विशेष पोशाख, आभूषणं , अलंकार, आणि शब्द निर्माण झाले... ठराविक ठिकाणी प्रवेश मिळण्यासाठी परवलीचे शब्द तयार झाले. प्रवेशद्वारावरील पहारेकर्याच्या शि...
Posts
Showing posts from May, 2019