मतदानाचा दिवस सकाळपासून खुरमांडी घालून बसलेल्या तात्याबानं दुमडलेला पाय सरळ केला , पायाला आलेल्या मुंग्याना वाट करून द्यायला एका हातानं पाउलाचा अंगठा दुमडला , खुब्याच्या हाडांमधे उठलेली एक बारीक पण सणसणीत कळ पचवली आणि कानावरून अर्धी विझवून ठेवलेली विडी काढली . बसकनाच्या खाली ठेवलेली माचीस शोधायला हात घातला पण ती मिळेना ... " इच्यामारी ! नेली वाटतं ... म्हाताऱ्याला माचीस पण ठिवत नाहीत का काय आता ." ... माचीस लंपास केलेल्या आपल्या मुलाच्या नावानं उद्धार करून तो कोनाड्यात ठेवलेली दुसरी माचीस शोधायला सरपटत भिंतीलगत सरकला . दोन चार फूट सरकतानापण होणारा त्रास कपाळावर त्याच्या चार जादा उमटलेल्या आठ्यांमधून दिसत होता . धूर काढायची तल्लफ आलेल्या तात्याबान तो त्रास तसाच गिळला आणि कोनाड्यात वर हात घालून कशीबशी माचीस मिळवली ... तिथंच भिंतीला टेकून त्यानं बिडी शिलगावली आणि एक दमदार झुरका छातीत ...
Posts
Showing posts from April, 2019