२० मार्कांचं नागरिकशास्त्र ... वेळ: सकाळी ७.०० वा स्थळ : सोसायटी जवळचा हमरस्ता भल्या मोठया लांब साखळीच्या ( ओह सॉरी , डॉग लीश म्हणतात हल्ली त्याला ) एका बाजूला व्यवस्थित पांढऱ्या केसांचा बॉब राखलेलेल्या, अंगात अमेरिकेच्या मागील दौऱ्यात घेतलेला पुलओव्हर आणि जॉगिंग ट्रॅकपॅन्ट घातलेल्या काकू ( त्यांना असं संबोधण्याच धाडस मी लिहितानाच फक्त करू शकतो ) आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावरचा दिसेल तो कचरा पालापाचोळा आणि इतर बरच काही हुंगत चाललेला त्यांचा 'रोव्हर' पाहून मी थांबलो ... त्यांचा माझा परिचय सोसायटीत राहण्याऱ्या एक ह्यापलीकडे हल्ली जरी नसला तरी एकेकाळी त्यांनी गणेशउत्सवात म्हटलेल्या एका उथळ गाण्यामुळे लक्षात राहिलेला... " काय म्हणताय ? कश्या आहात ? कसं काय चाललंय प्रदीपच ? " ( खरंतर मी 'पद्या' असा उल्लेख करणार होतो पण म्हटलं जाऊदे . इंजिनेरींग च्या पहिल्या आणि शेवटच्या वर्षात दोन दोन वर्ष अभ्यास करून पद्या आता अमेरिकेत असतो हे मला तेवढ्य...
Posts
Showing posts from February, 2019