Posts

Showing posts from October, 2018
स्थलांतराच घड्याळ...  " तब्बल पंचवीसशे मैल प्रवास करत उत्तरेकडील भागातून पार मेक्सिको मध्ये जातात हि फुलपाखरं... चमत्कार निसर्गाचा... एवढासा जीव कुठून कुठे प्रवास करतो नाही का!. कमाल आहे....  चला झोपायला पाहिजे, उद्या सकाळी लवकर उठायचंय, साडेसात ची फ्लाईट आहे" ... काही तासांचा विमान प्रवासही नकोसा झालाय हे चेहऱ्यावर दाखवत मी  टी व्ही चा रिमोट दाबून ती डॉक्युमेंटरी बंद केली. रात्रभर त्या मोनार्क फुलपाखरांचे थवे माझ्या डोक्यात उडत राहीले. अंथरुणात पडल्यापडल्या डोळे टक्क उघडे ठेवून ती प्राण्यांच्या स्थलांतरावरची फिल्म पुन्हा पुन्हा मी आठवत राहीलो... एक ना अनेक, निसर्गाचे ते अचंबित करणारी रूपं बघत...  झोपेच्या पूर्ण आधीन होवून स्वप्नांच्या राज्यांत मायग्रेट होऊनहि पाहात राहिलो... वर्षाच्या ठराविक काळात आफ्रिकेच्या सेरेंगेती मधील धावत सुटणारे विल्डेबिस्ट, श्रीलंके मध्ये दरवर्षी अनेक मैल चालत जाऊन एका तळ्याकाठी विशिष्ट काळात जमणारे हत्तीचे कळप, सैबेरिया च्या थंड प्रदेशातून पार राजस्थान च्या उष्ण प्रदेशापर्यंत उडत जाणारे सायबेरियन क्रेन्...
" कलायडोस्कोप " जुन्या फोटो चा आल्बम शोधायला माळ्यावरच्या ट्रंके चा तळ उपसत होतो आणि हाती त्याहूनही काहीतरी मौल्यवान गवसलं... "सुवासिक मोगरा"... बाहेरच्या बाजूचे लेबल पिवळट काळपट पण आजूनही स्पष्ट  दिसत होत.... उदबत्तीचे ते जुने षटकोनी नळकांडे एका क्षणात ओळख पटवून गेलं... शाळेत असताना बनवलेला माझा   कलायडोस्कोप  ..!!... त्यातल्या बांगडीच्या काचा आजूनही तशाच सुंदर सुंदर दिसत होत्या आणि फिरवताना होणारा त्याचा किणकिण आवाज पण...  नळकांडी च्या समोरील काचेतून अंधुक प्रकाशात फिरणारे ते बांगड्यांच्या तुकड्यांचे भौमितिक आकार मला भौतिक जगातून उचलून मागे कुठे तरी घेऊन गेले...  टाइम मशीन नेतं ना काळाच्या पुढे किंवा मागे ...तसंच.  त्या वस्तूशी जोडलेल्या असंख्य आठवणी... हळूहळू काचांचे तुकडे धूसर होत गेले आणि आठवणींची नक्षी फेर धरून नाचायला लागली... ... आणि मग रंगून गेलो मी त्या रंगबिरंगी षटकोनी विश्वात... खरं काय शोधत होतो ह्याचा विसर पडून...!!! जुने अल्बम, FM वर लागलेल गाणं,खाण्यात अवचित आलेला एखादा पदार्थ क...
...लग्नाच्या शादीच वेडिंग....   रद्दी पेपर च्या गठ्ठ्यात एक जाडजूड पाकीट दिसल... कोणाची तरी लग्न पत्रिका...  सोनेरी मखमली वेलबुट्टी च्या अक्षरात लपेटून गोंडेदार रेशमी दोऱ्यात बांधलेली... पाच पानी आमंत्रण पत्रिका... " टाकू नकोस. राहूदे.छान आहे किती..." सौ ने अभयदान दिलेली ती पत्रिका मी तीच्या हातात ठेवली आणि निमूटपणे  उरलेली रद्दी टाकून आलो... .(खरतर रद्दी मागे ठेवून परत उपयोगी होणारे कागद टाकून आलो म्हणा!!.)   "अरे ,जयंत आणि निशी च्या सेजल च्या लग्नाची पत्रिका आहे ही.." ती आजून त्या बेगडी ५ पानातच गुरफटलेली...  " काय थाट केला रे त्यांनी ... ४ दिवसाचा कार्यक्रम , आधी संगीत , मेहेंदी , मग बारात, लग्न आणि शेवटच्या दिवशी ले मेरिडीयन ला कॉकटेल डिनर रिसेप्शन...काय धमाल आलीय म्हणून सांगू. ..तस होमहवन वगैरे पण केल म्हणा. सेजल च्या सासरच्याना हवे होते म्हणे सगळे आपल्याप्रमाणे विधी. "...  एकंदर, जयंत आणि निशी ह्या कुलकर्णी दाम्पत्याची ची. सौ. का. सेजल थाटामाटात लग्न होऊन स...