" राष्ट्रभाषा "…. " वो काटा हुवा कांदा और लसुन पहिले वाटो और फिर तेलपे परतो "… चहा चा पहिला घोट घेतला आणि तेव्हढ्यात आतून हे वाक्य कानावर पडलं . तोंडातला चहा फसकन बाहेर पडणार नाही इतक्याच बेताने हसलो पण तरी तीला ते समजलच … " मग ? कस सांगशील त्याला हे तुझ्या शुद्ध हिंदीत ? सांग बरं " तिने आता माझी विकेट काढली . मी पण आठवायचा प्रयत्न करत राहिलो " वाटो " आणि " परतो " ला खरा हिंदी शब्द शोधण्याचा . राष्ट्र भाषा प्रचार समिती च्या प्राथमिक , प्रथमा , द्वितीय , तृतीया सगळ्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण आहे मी . म्हणजे काय ? अहो , सार्टीफिकेट आहेत अजून घरी पुण्याला ... माळ्यावरच्या ट्रंकेत . थोडा टच गेलाय हल्ली इतकच . सापडेल पर्यायी हिंदी शब्द … मनाची समजूत काढून आणि ऑफिस ला उशीर होतोय च्या नावाखाली मी बाथरूम कडे पळ काढला .... पण एव्हाना तिच्या हिंदीने फास्ट ट्रॅक पकडला होता …" आरे वो पंखा नीट पुसो रे बाबा , कितना क...
Posts
Showing posts from September, 2018
- Get link
- X
- Other Apps
प्रतिबिंब ... कोणताही चांगला काढलेला फोटो पहिला कि मनात काही विचार दाटून येतात... माझ्याही... त्या फोटोतल्या सौंदर्याबद्दल, त्या टिपलेल्या क्षणांनाबद्दल त्यातील भाव आणि फोटोपलीकडे जाऊन त्यामागे दडलेलं काही शोधण्याच्या प्रयत्नात हे विचार व्यक्त होतात... पाण्यात दिसणाऱ्या आपल्या भोवतीच्या परिसराच्या प्रतिबिंब सारखे. माझी अशीच एक उत्तम फोग्राफर मैत्रीण भक्ती गोखले-वैद्य काही ना काही कुठे कुठे काढलेले फोटो पाठवत असते आणि मग ह्या विचारांना चालना मिळते... अश्याच काही पाठवलेल्या तिने काढलेल्या सुंदर छायाप्रकाशचित्रांवर वेळोवेळी प्रतिबिंबित झालेले माझे विचार आज इथे मांडतोय... एक महत्वाचं ... जर काही ह्या विचारांमध्ये तुम्हाला छान सापडलं तर त्याच सारं श्रेय जातं फक्त ...आणि फक्त ...भक्तीच्या सुंदर छायाचित्रांना. ॲलिसच्या नजरेतून... ॲलिस इन वंडरलॅंड मधे तीच्या नजरेतून दिसणारं फुलपाखरू जसं पडद्यावर दिसतं ना...तसंच काहीसं हे दृश्य... पाहाणारा होतो लहान आणि फूल व पाखरू दिसतं भव्य, भासमान,..!!! निसर्ग सगळा असाच आहे... आपण...
- Get link
- X
- Other Apps
" ग्लोबल , ३ …, २ …, १ … ० " ३ … , बार्सिलोना , वेळ : दुपारी २ वा .... वाईन पास्ता च्या मंद सुगंधात आणि बियर च्या ओसंडून वहाणाऱ्या उत्साही वातावरणात त्या तिघीं कोपऱ्यातल्या टेबलवर बराच वेळ अड्डा टाकून होत्या … गेल्या २ तासात बरेच वाईन ग्लास संपवून त्यांच्या आवाजाला चढलेली धार आणि मधूनच लागणारी खोकल्याची उबळ गप्पांना रंग भरत होती .… आजूबाजूच्या टेबलाना त्यांच सोयर नव्हत आणि आपल्या गप्पाष्ट्कांचे सुतक इतरांना लागेल हे त्या तिघींच्या खिसगणतीतही नव्हतं . प्रत्येकीच आपापलं पाकीट संपवून आता त्या तिघीत एक सिगारेट फिरवे पर्यंत पोचल्या होत्या …. गेल्या दोन तासात धुराच्या ढगांमध्ये त्यांच्या सुरकुतलेल्या चेहेर्यावर उमटणारे भाव मात्र त्यांच्या बोलण्याचा विषय स्पष्ट सांगत होते . कपाळावर कमीजास्त उमटणार्या प्रत्येक आठी मध्ये सांगणारीच्या सुनेचे गुण अवगुण दिसत होते … अखंड गप्पा मारून , थरथरत्या हातान वेटर ला टीप ठेवत आणि रिकाम सिगारेट पाकीट चुरगळून टाकत त्...